उत्तम अभिनयासाठी काही पण... अमिताभ बच्चन यांनी चक्क खऱ्या सापासोबत केला सीन शूट, खुद्द बिग बींकडून मोठा खुलासा
पाहा काय म्हणाले अमिताभ...
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या 'कौन बनेगा करोडपती 14' चं सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. यावेळी अमिताभ यांनी खुलासा केला की त्यांना सापाची खूप भीती वाटते.
Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार
अमिताभ पुढे स्पर्धकाला प्रश्न विचारत एक फोटो शेअर करतात आणि त्यावर प्रश्न विचारतात. या फोटोत चार वेगवेगळी चित्र असतात. एक बकरी, दुसरा साप, तिसरी गाय आणि चौथा वाघ असतो. या प्रश्नाचं उत्तर साप आहे. या प्रश्नानंतर अमिताभ त्यांच्या सापाच्या भीतीविषयी सांगतात.
आणखी वाचा : उच्च अधिकारी किंवा CEO ही कमवत नाही त्या पेक्षा अधिक कमावते? या मुलीची एका महिन्याची कमाई ऐकून व्हाल थक्क
आणखी वाचा : बोंबला! लग्नात नवरा-नवरीसोबत केलेली चेष्टा पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात
सगळ्यात आधी स्पर्धक सांगतो की साप पाहिला की त्याला इतकी भीती वाटते की त्याला ताप येतो. यावर अमिताभ सहमत होतात आणि बोलतात की त्यांच्यासोबतही असंच घडतं. याविषयी पुढे सविस्तर सांगत अमिताभ बोलतात. 'माझ्या प्रोफेशनमध्ये मला सापांपासून दूर राहणं खूप अवघड आहे. त्यामुळे मलाही ताप येतो. मी सापांशी बोलायचा प्रयत्न करतो आणि आम्ही त्याला विनंती करतो की मला चावू नका. मी खूप मौल्यवान आहे.'
Vishwakarma Puja 2022: तुमच्याकडे गाडी आहे तर 'या' दिवशी नक्कीच करा विश्वकर्मा पूजा
अमिताभ यांनी चित्रपटातील एका सीनचा उल्लेख केला आणि सांगितले, 'एका सीनमध्ये माझ्या छातीवर साप येतो आणि भाऊ, त्यावेळी मला असं वाटलं की माझा जीव गेला आहे. मी माझ्या दिग्दर्शकाला सांगितले की मी हा सीन करू शकणार नाही. बराचवेळ चर्चा केल्यानंतर दिग्दर्शकाने मला सांगितले की तो खोटा रबरचा साप माझ्या छातीवर ठेवणार. मग त्याच्यासमोर मी माझे डायलॉग बोलायचे. माझं असं झालं की हा हे बरोबर आहे. (Amitabh Bachchan Reveals When He Holded Real Snake To Shot A Scene Without Knowing Its Not Made Of Rubber)
Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य
बिग बी पुढे म्हणाले, 'तो साप पकडताना मी खूप शांत होतो. मी त्या खोट्या सापाशी बोलू लागलो. पण सीन संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. माझ्या एका असिस्टंटनं येऊन मला सांगितले की हा साप रबराचा नाही. तो खरा साप होता ज्याच्यासोबत तू हा सीन केला. बिग बी म्हणाले की, हे त्यांच्यासाठी आश्चर्यचकित होते आणि त्यांना विश्वास बसत नाही की ते खरा आणि खोटा साप ओळखू शकत नाही. अमिताभ बच्चन यांचा हा किस्सा ऐकून सर्वजण मोठ्याने हसायला लागले आणि त्यांचे कौतुक करू लागले.