मुंबई : लहानपणी प्रत्येक मुलगी कधी ना कधी जलपरी होण्याचे स्वप्न पाहते. जर डिस्नी चित्रपटांमध्ये दिसणारी जलपरी तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला लगेच कळेल की जलपरींकडे लोक आकर्षित का होतात. पण जसे आपण मोठे झालो तसे आपल्याला कळले की जलपरी असणं हे फक्त एक स्वप्न आहे. बऱ्याच सीरिज आणि हॉलिवूड चित्रपटांची जलपरीची पटकथा होती. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय, हा व्हिडीओ पाहून तिथे प्रत्यक्षात जलपरी आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, हे फक्त एक कमाईचे साधन आहे.
या मुलीनं तिचं स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 32 वर्षीय एमिली अलेक्झांड्रा गुग्लिएल्मोनं (Emily Alexandra Guglielmo) तिच्या डिस्नेमध्ये असलेल्या एरियल नावाच्या पात्राचं एक नवीन व्हर्जन सगळ्यांसमोर मांडलं आहे. यामुळे ती महिन्याला $8,000 (म्हणजे सुमारे 6 लाख रुपये) कमवून तिची स्वप्न पूर्ण करते. तिला मुलांच्या पार्ट्यांसाठी तसेच पंचतारांकित कार्यक्रमांसाठी नियुक्त केले जाते आणि एमिली ही तिचा संपूर्ण दिवस स्विमिंग पूलमध्ये घालवते. ती तिचे हे सर्व फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि टिक टॉकवर तिच्या फॉलोअर्ससोबत शेअर करते.
या मुलीनं द सनला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, 'मरमेड बनणे खूप खास आहे कारण मला लोकांची स्वप्ने सत्यात उतरवायला मिळतात. ते सांताक्लॉजवर विश्वास ठेवतात त्याप्रमाणे मी खरी मरमेड आहे. मी लहान असताना दर आठवड्याच्या शेवटी समुद्रकिनारी जायचे आणि समुद्रात पोहायला जायचे.'
ती पुढे म्हणाली, 'जेव्हा मी फोटोशूटसाठी गेले होते, तेव्हा मी फक्त 22 वर्षांची होते, तेव्हा मी मरमेडसारखा फोटो काढण्याचा निर्णय घेतला. मी $3,400 मानधन घेतले आणि मला माहित नव्हते की ते किती आकर्षक दिसेल. त्यानंतर लोक माझ्याकडे येऊ लागले आणि त्यांच्या कार्यक्रम-पार्ट्यांसाठी मला कामावर येण्यास सांगू लागले.' (mermaid girl earns 6 lakh rupees every month by posting this photos)
ती पुढे म्हणते की, 'तिचा बॉयफ्रेंड तिच्या करिअरला पाठिंबा देतो आणि Behind The Scene मदत करतो. तिनं असेही सांगितलं की जेव्हा पुरुष तिच्या संपर्कात येतात आणि तिला सेक्सी फोटो आणि व्हिडिओसाठी पोज देण्यास सांगतात तेव्हा त्याला ते सेक्सी वाटतं.'