Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार

जाणून घ्या AC मध्ये राहण्याचे तोटे

Updated: Sep 9, 2022, 06:36 PM IST
Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार title=

Side Effects Of Using AC: देशभरात पावसाळा जवळपास संपला आहे. मात्र, तरीही देशातील बहुतांश राज्यांमध्ये कडक उन्हाळा सुरूच आहे. सगळ्यात महत्तावची गोष्ट म्हणजे लोक एसीतून बाहेर पडत नाहीत. उन्हापासून वाचण्यासाठी लोक घरं, कार्यालयं आणि गाड्यांमध्ये एसी किमान तापमानात चालवत आहेत. लोकांना एसीमध्ये राहण्याची सवय झाली आहे. पण तुम्हाला माहितीये का की एसीमध्ये जास्त वेळ घालवणं आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं. एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यानं इन्फेक्शन, अॅलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यानं तुम्हाला कोणते दुष्परिणाम होऊ शकतात.

आणखी वाचा : उच्च अधिकारी किंवा CEO ही कमवत नाही त्या पेक्षा अधिक कमावते? या मुलीची एका महिन्याची कमाई ऐकून व्हाल थक्क

कोरडे डोळे

एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने डोळ्यांना इजा होऊ शकते. एसीमध्ये असल्यानं डोळे कोरडे होऊ शकतात. जर तुमचे डोळे कोरडे असतील तर तुम्हाला त्यात जास्त खाज आणि जळजळ जाणवेल. त्यामुळे ज्या लोकांना ड्राय आय सिंड्रोम आहे त्यांनी एसीमध्ये जास्त वेळ घालवू नये.

आणखी वाचा : बोंबला! लग्नात नवरा-नवरीसोबत केलेली चेष्टा पाहून तुम्हीही माराल डोक्याला हात

कोरडी त्वचा

कोरड्या डोळ्यांसोबतच एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यानेही त्वचा कोरडी होण्याची समस्या उद्भवू शकते. ही एक सामान्य समस्या आहे. पण एसीमध्ये असल्यामुळे त्वचा अधिक कोरडी झाली की मग खाज सुटते. यामुळे त्वचेवर पांढरे डाग आणि खाज येऊ शकते.

Vishwakarma Puja 2022: तुमच्याकडे गाडी आहे तर 'या' दिवशी नक्कीच करा विश्वकर्मा पूजा

डिहाइड्रेशन 

एसीमध्ये जास्त वेळ राहिल्याने उष्णतेपासून आराम मिळतो, तर डिहायड्रेशन होऊ शकते. सामान्य खोलीपेक्षा एसी रूममध्ये डिहायड्रेशन जास्त असते. वास्तविक, एसी खोलीत असलेला ओलावा शोषून घेतो, त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य

श्वसन रोग

एसीमध्ये जास्त वेळ घालवल्यानेही श्वसनाचा त्रास होऊ शकतो. एसीमध्ये राहिल्याने घसा कोरडा होणे, राइनाइटिस आणि नाक बंद पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. ही अशी स्थिती आहे ज्यामुळे नाकातील आतल्या भागाच सूज येते.

आणखी वाचा : Queen Elizabeth II च्या आमंत्रणाला अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार, जाणून घ्या कारण

डोके दुखी 
एसीमुळे डिहायड्रेशनसोबतच डोकेदुखी आणि मायग्रेनसारख्या समस्याही उद्भवू शकतात. डिहाइड्रेशन हे एक ट्रिगर आहे ज्यामुळे अनेकदा मायग्रेनच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. जेव्हा तुम्ही बाहेरच्या उष्णतेतून एसी रूममध्ये प्रवेश करता किंवा एसी रूमच्या बाहेर जाता तेव्हा तुम्हाला ही समस्या होऊ शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)