Amitabh Bachchan and Ajitabh Bachchan : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचे लाखो चाहते आहेत. वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ यांचा फिटनेस पाहून तरुणाईला लाज वाटते. मोठ्या पडद्यापासून छोट्या पडद्यापर्यंत सगळीकडे आपल्याला अमिताभ बच्चन पाहायला मिळतात. सध्या ते 'कौन बनेगा करोडपति 15' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहेत. त्यावेळी ते त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगताना दिसतात. दरम्यान, आता अमिताभ यांनी त्यांचा भाऊ अजिताभ यांच्याविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कौन बनेगा करोडपति 15' च्या फॅमिली स्पेशल वीक दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी भाऊ अजिताभ बच्चन यांच्या विषयी एक किस्सा सांगितला आहे. बिग बींनी यावेळी त्यांच्या अभिनय करिअरच्या सुरुवातीला मिळालेल्या पाठिंब्याविषयी सांगितलं. ते म्हणाले की अजिताभ यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. तर ते स्वत: कोलकातामध्ये 9-5 नोकरी करायचे. याविषयी सगळं सांगताना अमिताभ म्हणाले की 'तुम्हाला माहितीये जसं एक भावा-बहिणीचं नातं किंवा मग दोन भावांचं नातं असतं ना, त्यातही जो लहाण असतो ना त्याच्याविषयी एक प्रोटेक्टिव्ह वातावरण निर्माण होतं. त्याच्यावर जास्त लक्ष देतात. आम्ही कोलकातामध्ये नोकरी करत होतो आणि तेव्हा त्यानं माझा फोटो काढला आणि एका कॉम्पिटिशनसाठी पाठवला होता. त्यानंतर मला सांगितलं की बघ तू चित्रपटांमध्ये जायला हवं. अजिताभ हे लंडनमध्ये त्यांच्या कुटुंबासोबत राहत असून ते एक बिझनेसमॅन आहेत. 


हेही वाचा : फ्लॉप चित्रपटांचा कंगनानं घेतला धसका; देवाच्या दारी जाऊन घेतला मोठा निर्णय


या आधीच्या एपिसोडमधअये अमिताभ यांनी त्यांच्या कुटूंबाविषयी एक गंमत सांगितली होती. त्यांच्या कुटुंबाला ते 'मिनी भारत' म्हणाले. त्यावेळी त्यांनी त्यांची मुलं अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन यांचे पार्टनर वेगवेगळ्या ठिकाणांचे असल्याचे सांगत म्हणाले की अभिषेकचं लग्न ऐश्वर्या रायसोबत झालं ती मल्याळी आहे. श्वेताचं लग्न निखिल नंदाशी झालं तो पंजाबी आहे. तर कुटुंबासा मिनी इंडिया सांगत ते म्हणाले की कुटुंबात ते एक सॅन्डविच बनतात. तर एका एपिसोडमध्ये त्यांनी जया बच्चन यांच्यासोबत केलेल्या बंगाली लग्नाविषयी सांगितलं. ते म्हणाले होते की लग्नाच्या सगळ्या विधी सुरु असताना त्यांना पारंपरिक टापोर परिधान करण्यास नकार दिला. कारण त्यांना ते आवडलं नव्हतं. याशिवाय त्यांनी सांगितलं की त्यानंतर ते पत्नी जया आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागत राहिले.