फ्लॉप चित्रपटांचा कंगनानं घेतला धसका; देवाच्या दारी जाऊन घेतला मोठा निर्णय

Kangana Ranaut Lok Sabha Election In 2024 :  कंगना रणौतनं एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. नेमकं कंगणाला काय म्हणायचं आहे हे जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 3, 2023, 01:30 PM IST
फ्लॉप चित्रपटांचा कंगनानं घेतला धसका; देवाच्या दारी जाऊन घेतला मोठा निर्णय title=
(Photo Credit : Social Media)

Kangana Ranaut Lok Sabha Election In 2024 : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'तेजस' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यात दुसरीकडे कंगना नेहमीत राजकारणानंतर पदार्पण करण्यावर नकार देत असते. आता पहिल्यांदा कंगनानं राजकारणात प्रवेश करण्याविषयी हिंट दिली आहे. यावेळी कंगना तिच्या 'तेजस' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक मंदिरात जाऊन दर्शन घेताना दिसते. तर आता कंगना म्हणाली की श्रीकृष्णची कृपा राहिली तर ती लोकसभा निवडणूक लढणार. 

'तेजस' या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सगळ्या देवस्थळांचे दर्शन घेत असताना आता ती द्वावरकाधीश मंदिरात पोहोचली आहे. यावेळी मीडियाशी बोलत असताना तिनं लोकसभा निवडणूक लढण्याविषयी हिंट दिली आहे. 'आज तक'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, ती यावेळी म्हणाली की श्रीकृष्णची कृपा राहिली तर लोकसभा निवडणूक लढणार. याशिवाय तिनं द्वारकानगरी विषयी देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत. तिनं सांगितलं की ' हे खूप सुंदर आहे. मी नेहमी म्हणते की, कामातून संधी मिळेल तेव्हा जास्तीत जास्त देवाचे दर्शन घेतले पाहिजे. संपूर्ण पाण्याखालील असलेले द्वारकाचे संपूर्ण शहर नुकतेच पाहिले आहे. द्वारका शहराचे अवशेषही आम्हाला पाहता यावेत, अशा सुविधा सरकारने उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची इच्छा आहे. आपल्या इतिहासात एवढी मोठं जे नगर राहिलं आहे, जे आपल्या प्रभू कृष्ण हे आपल्यासाठी कोणत्याही स्वर्गपेक्षा कमी नाही.'

दरम्यान, कंगनानं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत विचारलं की एका मुलाखतीत राजकारणात प्रवेश करण्याचा विचार आहे का? 'टाईम्स नाउ'शी झालेल्या या संवादात कंगना म्हणाली, 'कलाकार असल्यामुळे मला राजकारणात रस आहे, पण आता ही झाइन करणं माझ्यासाठी खूप घाई आहे.' यावेळी कंगना मोदी सरकारचे कौतुक करत कंगना म्हणाली 'त्यांच्या सरकारमुळे देशात अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि आपला भारत दिवसेंदिवस चांगला होत आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : पार्टीत परदेशी तरुणी अन् नशेसाठी चक्क विषारी साप; एल्विश यादवविरोधात FIR

कंगनाच्या तेजस चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी तिनं 1.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. चार दिवसात या चित्रपटानं 4.25 कोटी कमावले होते. तर काही चित्रपटगृहात तिकिट विकली गेली नाही त्यामुळे 'तेजस'चे शो कॅन्सल करण्यात आले.