अमिताभ बच्चन यांच्याकडून दीपिका-रणवीरबद्दल मोठा खुलासा
`कौन बनेगा करोडपती` या क्विझ शोने आजकाल प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' या क्विझ शोने आजकाल प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. दीपिका पदुकोण आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यावेळी शो 'शानदार फ्रायडे'च्या सेगमेंटमध्ये सहभागी होणार आहेत. या शोचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लव्हस्टोरीचा एक किस्सा फराह खानसमोर शेअर करतात. यावेळी ते असं काही म्हणाली जे ऐकून प्रेक्षक देखील थक्क झाले आहेत. यावेळी ते त्यावेळचा किस्सा शेअर करत आहेत. जेव्हा ते रणवीरच्या एक्सप्रेशनमुळे कंफ्यूज झाले होते.
अमिताभ यांनी पुरस्कार सोहळ्याशी संबंधित सांगितला एक किस्सा
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, दीपिका पदुकोण आणि फराह खान अमिताभ यांच्या समोर हॉट सीटवर बसलेले आहेत. यानंतर अमिताभ म्हणतात, मी तुम्हाला सांगतो की, आमच्यासोबत एक दुर्घटना झाली. जसं आपण चित्रपटसृष्टीत आहोत, पुरस्कार समारंभ, फंक्शन्स होत राहतात, म्हणून आम्हीही एका सोहळ्यात गेलो होतो. आणि रणवीर सुद्धा त्याच फंक्शनमध्ये आला होता. या पुरस्कार सोहळ्यात रणवीर क्रेनद्वारे वरून खाली येत होता. खूप गाणी वाजत होती. तो क्रेनमधून खाली उतरत होता.
अमिताभ यांनी रणवीरच्या हावभावाचा करुन घेतला होता गैरसमज
अमिताभ म्हणाले की, जेव्हा तो वरुन खाली येत होता. तेव्हा तो बोटाने इशारा करत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता, ज्यामुळे मला हावभाव समजले नाही. पण त्याच्या स्वतःच्या शैलीत तो काहीतरी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता. हे चक्र बराच काळ चालू राहिलं, तेव्हाच माझी पत्नी जया म्हणाली, तो तुमच्याकडे इशारा करत नाही. थोड्या वेळाने पुन्हा मला जया म्हणाली, तुमच्या बाजूला बघा, जेव्हा मी पाहिलं की, माझ्या बाजूला दीपिका जी बसल्या होत्या. रणवीर दीपिकाकडे बोट दाखवत होता. तेव्हा त्यांचा गैरसमज दूर झाला. यावेळी ते म्हणाले हे सगळं यांच्या लग्नाच्या आधी पासून सुरु होतं. हे मला त्यावेळीच समजलं होतं.
व्हिडिओ सोनी टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये #KBC13. शानदार शुक्रवारमध्ये आज रात्री ९ वाजता. फक्त सोनी वर. मात्र, आता हा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्रामवरून हटवण्यात आला आहे. डिलीट होण्यापूर्वी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.