Amitabh Bachchan Aaradhya's Performance : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी नुकतीच मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत आराधाच्या शाळेत हजेरी लावली होती. यावेळी आराध्यानं तिच्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आराध्यानं नाटकात भाग घेतला होता. तर तिच्या या नाटकाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. तिचा अभिनय हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. जेव्हा आराध्या स्टेजवर परफॉर्म करत होती तेव्हा तिच्याकडे बच्चन कुटुंब हे आनंदानं पाहत होतं. त्यावर आता अमिताभ बच्चन यांनी नात आराध्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चांगलीच चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ यांनी नुकताच एक ब्लॉग शेअर केला आहे. त्यात ते म्हणाले की लवकरच परतेन. आराध्याच्या शाळेतील कॉन्सर्टमध्ये थोडा व्यस्त होतो. त्यानं किती चांगलं परफॉर्म केलं. ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. स्टेजवर ती छोटी मुलगी किती छान अभिनय करत होती. असं वाटलं नाही तर कोणी परफॉर्म करतंय. खरंतर ती आता इतकी छोटी राहिली नाही. त्यामुळे थोड्या वेळानं भेटूया. त्याशिवाय त्याखाली बिग बींनी त्यांची सही देखील केली आहे. 



अमिताभ बच्चननं यांनी याशिवाय आधीचं ट्विटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी लिहिलं की 'मुलीच्या कामगिरीचा अभिमान आणि आनंद आहे'. त्यांच्या या ट्वीटला देखील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते सगळ्यात शेवटी टाइगर श्रॉफ आणि कृति सेननच्या 'गणपत' मध्ये दिसले होते. तर याशिवाय 'कल्कि 2898 एडी' मध्ये प्रभास, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्यासोबत दिसणार आहे. तर याशिवाय ते हॉलिवूड चित्रपट 'द इंटर्न' च्या हिंदी रिमेकमध्ये देखील दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे. 



हेही वाचा : Animal च्या पुढच्या भागात तृप्ती डिमरी नाही तर 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर


दरम्यान, या कार्यक्रमात पहिल्यांदा आराध्याचा वेगळा लूक पाहायला मिळालं. इतकंच नाही तर तिचं कपाळ पहिल्यांदा या कार्यक्रमामुळे पाहायला मिळाला. त्यावरून सोशल मीडियावर नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत. तर काही नेटकऱ्यांना ऐश्वर्याचा 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ताल' या चित्रपटाची आठवण आली आहे.