Animal च्या पुढच्या भागात तृप्ती डिमरी नाही तर 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर

Animal Park : 'ॲनिमल' हा चित्रपट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या दुसऱ्या भागाची चर्चा चांगलीच रंगली असताना आता त्या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा रंगली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 17, 2023, 11:16 AM IST
Animal च्या पुढच्या भागात तृप्ती डिमरी नाही तर 'या' दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर  title=
(Photo Credit : Social Media)

Animal Park : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'ॲनिमल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटानं 16 दिवसात बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा आकडा पार केला आहे. तर वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चित्रपटानं 800 कोटींच्या जवळ पोहोचला आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाची एकीकडे सगळ्यांना भुरळ पडली असताना आता त्याच्या दुसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार याची चर्चा सुरु असताना. यातही आपल्याला एक दाक्षिणात्य अभिनेत्री दिसणार आहे. 

सोशल मीडियावर एक गोष्ट चांगलीच चर्चेत आहे आणि ती म्हणजे रणबीर कपूरच्या 'ॲनिमल पार्क' ची. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री मालविका मोहनन दिसणार आहे. तर तृप्ती डिमरीप्रमाणे ती रणबीरच्या विरोधात असणाऱ्या टीममध्ये असेल. दरम्यान, यावर अजून काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. याविषयी चित्रपट समिक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत सांगितलं की मालविका आणि रणबीर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेलं हे ट्वीट चांगलंच व्हायरल होतंय. त्यामुळे आता चाहत्यांना त्या दोघांना एकत्र स्क्रिनवर पाहण्यासाठीची जी उत्सुकता आहे ती प्रचंड वाढली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

100 कोटी बजेट असणाऱ्या या चित्रपटानं पहिल्या दिवशी 63.8 कोटी, दुसऱ्या दिवशी 66.27, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी, चौथ्या दिवशी 43.96 कोटी, पाचव्या दिवशी 37.47 कोटी, सहाव्या दिवशी 30.39 आणि सातव्या दिवशी 24.23 कोटी कमाई केली. तर थोडक्यात या चित्रपटानं पहिल्या दिवशी 337.58 कोटींची कमाई केली. आठव्या दिवशी या चित्रपटानं 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 36 कोटी, अकराव्या दिवशी 13.85 कोटी, बाराव्या दिवशी 12.72 कोटी, तेराव्या दिवशी 10.25 कोटी आणि चौदाव्या दिवशी 8.75 कोटी कमाई केली आहे. 

हेही वाचा : 'मालगुडी डेज' मधल्या स्वामीला पाहिलंत का? आज करतोय 'हे' काम

'ॲनिमल' चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल, प्रेम चोप्रा, रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या चित्रपटात बॉबी देओलनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर त्याच्या या भूमिकेचा एकही डायलॉग नव्हता. तरी देखील त्यानं त्याच्यावर छाप सोडली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगानं केलं आहे.