बच्चन कुटुंबियांनी अशी साजरी केली होळी
गुरूवारी रात्री होळीचे दहन केल्यानंतर आज देशभरात धुलिवंदनाचा आनंद साजरा होत आहे. देशभरात रंगांचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
मुंबई : गुरूवारी रात्री होळीचे दहन केल्यानंतर आज देशभरात धुलिवंदनाचा आनंद साजरा होत आहे. देशभरात रंगांचा सण उत्साहात साजरा केला जात आहे.
बीग बींचे सेलिब्रेशन
सामान्यांप्रमाणेच बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनीदेखील काल मुंबईत होलिका दहन केले. यानंतर बीग बींनी काही फोटो सोशल मीडियाच्या माध्यामातून शेअर केले आहेत. सोबतच त्यांच्या चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
होळीचा आनंद
होलिका दहनाच्या कार्यक्रमानंतर जया बच्चन यांनी बीग बींना टिळा लावताना, आराध्या शुभेच्छा देताना काही फोटो शेअर केले आहेत.
'गुजिया'चा आनंद
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे होळीच्या सणाला पुरणपोळी केली जाते तसेच उत्तर भारतात होळीचा सण हा गुजिया म्हणजेच करंज्यांसोबत लुटला जातो. त्यामुळे होलिका दहानानंतर गुजिया खाल्ल्याचेही त्यांनी ट्विट केले आहे.
बॉलिवूडची होळी रद्द
24 फेब्रुवारी रोजी दुबईत श्रीदेवींचे निधन झाले. वयाच्या 54व्या वर्षी श्रीदेवींच्या अकाली निधनाची बातमीने त्यांच्या चाहत्यांसह अवघे बॉलिबूड हळहळले आहे. त्यामुळे यंदा अनेक कलाकारांनी होळी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.