Amitabh Bachchan Latest Video: क्रिकेटचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. सध्या आयपीएल सुरू आहे; तेव्हा सगळीकडे क्रिकेटचा मोहोल आहे. लहानपणापासून आपण क्रिकेटच्या मॅच पाहतो आहोत आणि अनुभवतो आहोत. क्रिकेटची मॅच पाहणं ही आपल्या सर्वांसाठीही एक वेगळीच पर्वणी असते. लहान मुलंही क्रिकेटमध्ये रस घेताना दिसतात. गल्लोगल्ली (IPL 2023) लहान मुलं ही क्रिकेट खेळताना आपण पाहतोच. सध्या अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात तो क्रिकेट खेळताना दिसतो आहे. यामध्ये तो एकावर एक चेंडू बॅटनं जोरात उडवताना दिसतो आहे. त्याचा हा आत्मविश्वास आणि टेलेंट पाहून खुद्द बिग बींनीही प्रसंशा केली आहे. (Amitach Bachchan shares an video of small boy playing cricket video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपरस्टार अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. बिग बी हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय आहेत. त्यांचे ट्विटर आणि इन्टाग्रामवरही कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. ते इन्टाग्रामवरून अनेक फोटो आणि व्हिडीओ हे शेअर करत असतात. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ विशेष चर्चेत आला आहे. यामध्ये त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ टाकला आहे ज्यात तो क्रिकेट खेळताना (Little Boy Playing Cricket Video) दिसतो आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, क्रिकेटचे भविष्य सुरक्षित हातांमध्ये आहे. यावेळी त्यांच्या या व्हिडीओखाली नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. 


यावेळी अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडीओवर नानातऱ्हेच्या कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोल्ही यांच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये लिहिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडीओची प्रसंशाही केली आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत 70 लाख लोकांनी पाहिला आहे. सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा असून या व्हिडीओला 9 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अमिताभ बच्चन यांचा 'उंचाई' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. त्यापुर्वी त्यांचा रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सोबतचा 'ब्रह्मास्त्र' हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. रश्मिका मंदानासोबतचा त्यांचा चित्रपटही यावर्षी (Upcoming Films of Amitabh Bachchan) प्रदर्शित झाला होता.


हेही वाचा - 'त्या' 26 पीडित मुली जगासमोर; The Kerala Story च्या निर्मात्यांनी समोर आणला पुरावा


आता प्रेक्षकांना त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रतिक्षा आहे. वयाच्या 81 व्या वर्षांही त्यांचा फिटनेस अगदी तसाच आहे. त्यांचा हा उत्साह पाहून त्यांच्या चाहत्यांनाही आणि त्यांच्या सहकलाकारांनाही त्यांचे कौतुक वाटते.