`हा` अभिनेता आहे अमृताचं क्रश !
`वाजले की बारा..` म्हणत अवघ्या महाराष्ट्राला नाचवणारी आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
मुंबई : 'वाजले की बारा..' म्हणत अवघ्या महाराष्ट्राला नाचवणारी आपली लाडकी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सौंदर्य, अभिनय आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेली ही मराठमोळी अभिनेत्री. अनेक चित्रपट, रियालिटी शो मधून आपले मनोरंजन करणारी अमृता आता ‘डान्स इंडिया डान्स ६’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे
आपले सौंदर्य आणि अदांनी अनेकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या मनावर मात्र दुसरंच कोणी राज्य करतं. याचा खुलासा खुद्द अमृतानेच केला आहे. एका मुलाखती दरम्यान, तुझा आवडता डान्सर कोण? या प्रश्नावर अमृता उत्तरते की, "रणवीर सिंगवर माझे क्रश आहे. त्याचे नृत्य कौशल्य मला फार आवडते. त्याला नाचताना बघितल्यावर माझ्या तोंडातून एकच शब्द येतो तो म्हणजे, वॉव! माझ्यासाठी केवळ रणवीर सिंग हा एकमेव अभिनेता आहे."