Amruta Pawar : नाटक हा अनेक कलाकारांचा जिव्हाळ्याचा विषय. मालिका सिनेमा करत असताना सुद्धा अनेक कलाकार प्रायोगिक असो वा व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाची परीक्षा घेतच असतात. आता पुन्हा एकदा एक  अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना एक गूढ अनुभव देण्यासाठी सज्ज होत असून ही अभिनेत्री म्हणजे 'अमृता पवार'. शाळेपासून अभिनयाची कास धरून आपल्या हळूहळू प्रेक्षकांच्या मनात जागा करणारी अमृता पवार '२१७ पद्मिनी धाम' या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाळा ते कॉलेज आणि मग मालिका असा अभिप्रेत अभिनयाचा प्रवास करणारी अभिनेत्री अमृता ही पहिल्यांदा कॆमेरासमोर आली ती म्हणजे दुहेरी या मालिकेतून, तिथून तिचा सुरु झालेला प्रवास हा आज पर्यंत कधी थांबला नाही. 'ललित २०५' या मालिकेतील तिने साकारलेली 'भैरवी' प्रेक्षकांना चांगलीच भावली. या नंतर ती स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजाऊ स्वीकारताना दिसली. जिजामाताची आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी अमृताने शिवकालीन युद्ध कलेचे आणि घोडेस्वारीचे चोख प्रशिक्षण घेतलं होत. या ऐतिहासिक भूमिके नंतर अमृता जिगरबाज या मालिकेत दिसली. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा ती प्रमुख भूमिकेत होती. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' या मालिकेने छोट्या पडद्यावरून एक्झीट घेतली असली तरी या मालिकेतील अमृता ने साकारलेली ' तानिया ' अनेकांच्या लक्षात आहे. मालिका विश्वात आपल्या अभिनयाने अमृताने मिळवलेल्या प्रेक्षक वर्गाला ती आता नाट्यगृहाकडे येण्यासाठी खुणावत आहे. करण भोगले निर्मित रत्नाकर मतकरी यांच्या कामगिरी कथेवर आधारित आणि संकेत पाटील दिग्दर्शित '२१७ पद्मिनी धाम' या नाटकात ती पद्मिनी ची भूमिका साकारत आहे. हे पात्र या नाटकाचं मध्यवर्ती पात्र आहे. या नाटकाच कथानक 'पद्मिनी' मुळे घडत असत. पद्मिनी साकारणारी अमृता हीच हे पहिलं वहिलं व्यावसायिक नाटक असल तरी रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव तिला आहे. रावराजेची एकुलती एक मुलगी पद्मिनी आणि मुरंजन अशा त्रिकुट भोवती या नाटकाची कथा घडत असते. पद्मिनी साकारण्यासाठी सज्ज असलेली अमृता सध्या जोमाने तालीम करत आहे. लवकरच रंगभूमीवर येणार हे '२१७ पद्मिनी धाम' या नाटकाच संगीत शुभेम ढेकळे करत असून नेपथ्य संदेश बेंद्रे करत आहेत. तर नाटकांची प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून नाटकाची सूत्र कल्पेश बाविस्कर आणि नितीन नाईक सांभाळत आहे.



हेही वाचा : सीमा हैदर अन् सचिनच्या घरी 'परी'चे आगमन, युट्यूबवरील कमाई सुद्धा वाढली


2016 पासून मालिका आणि मनोरंजनसृष्टीत काम करतेय. पण नाटक करण्याची संधी कधी मिळाली नाही. स्वतःच्या अभिनयाची प्रगल्भता ही नाटकानेच समजून येते. आता नाटक करावं म्हणून नाटक शोधत असतानाच २१७ पद्मिनी धाम साठी विचारणा झाली. रत्नाकर मतकरीच्या कथेवरील या नाटकांच वाचन जेव्हा माझ्यासोबत करण्यात आलं त्याच्या दुसऱ्याच क्षणी मी करतेय असं मी जाहीर केलं. या नाटकाचा दिग्दर्शक संकेत पाटील नवीन आहे तो संगीत दिग्दर्शक म्हणून अनेकांना माहिती असला तरी त्याची दिग्दर्शकाची बाजू किती दृढ आहे याचा मला प्रत्यय या नाटकाच्या निमित्ताने येतोय. एकांकिका करून मोठं होत असताना एकत्र येऊन एक मोठी कलाकृती उभं करण्यासाठीची धडपड जी माझ्यात होती ती मला या माझ्या या नाटकाच्या टीम मध्ये जाणवते. नाटकाचा शुभारंभ लवकरच होईल, आणि प्रेक्षकांना गूढ मनोरंजनाचा अनुभव आम्ही देऊ हे नक्कीच.