सीमा हैदर अन् सचिनच्या घरी 'परी'चे आगमन, युट्यूबवरील कमाई सुद्धा वाढली

Seema Haider and Sachin meena : सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या घरी एक लहाण पाहुणीचे आगमन झाले आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कमाईत वाढ झाली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 23, 2023, 03:24 PM IST
सीमा हैदर अन् सचिनच्या घरी 'परी'चे आगमन, युट्यूबवरील कमाई सुद्धा वाढली title=
(Photo Credit : Social Media)

Seema Haider : सीमा हैदरविषयी काही वेगळं सांगायची कोणालाही गरज नाही. कोणत्याही सेलिब्रिटीप्रमाणे तिच्याविषयी देखील अनेक गोष्टी सगळ्यांना माहित आहेत. पाकिस्तानातून आलेली सीमा हैदर किंवा सचिनसाठी पाकिस्तानातून आलेली सीमा अशी ओळख तिला मिळाली आहे. पाकिस्तानातून चार मुलांना घेऊन सीमा भारतात तिच्या प्रेमासाठी आली. ती भारतात येताच तिला इतकी लोकप्रियता मिळाली की तिला चक्क बॉलिवूडमधून देखील ऑफर मिळाली आहे. सीमा आणि सचिननं ग्रेटर नोएडामध्ये घर बनवलं आहे. या सगळ्यात सोशल मीडियावर सीमा हैदर आणि सचिन मीणा यांच्या कमाईची चर्चा सुरु आहे. चला तर जाणून घेऊया सीमा हैदर पैसे कसे कमवते.  

काही काळापूर्वी एक बातमी आली होती की सीमा आणि सचिनच्या घराची आर्थिक परिस्थिती ही काही चांगली नाही. त्यांना खाण्यासाठी देखील पैसे नाहीत. या सगळ्यात त्यांचं नवीन घरात शिफ्ट होणं, अनेकांच्या पसंतीस उतरलेलं नाही. सीमा हैदर आणि पती सचिन या दोघांनी त्यांचं इन्स्टाग्राम आणि युट्यूब अकाऊंट हे पब्लिक केलं आहे. ज्यामुळे त्या दोघांचे फॉलोवर्स प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे त्या दोघांची नेटवर्थ वाढली आहे. दोघांचे युट्यूब आणि इन्स्टाग्राम व्हिडीओला लाखो लोकांनी पाहिले आहे. पण अजूनही त्यांच्या कमाईचा आकडा समोर आलेला नाही. तर सीमा आणि सचिनच्या घरी नव्या पाहुणीचं आगमन झाले आहे. सीमाच्या मोठ्या जाऊ बाईंना मुलगी झाली आहे, त्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. 

हेही वाचा : मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत

एका मुलाखतीत सीनानं सांगितलं की सुरुवातीला माझं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट होतं. पण जेव्हा मला कळलं की लोकांना माझे व्हिडीओ आवडत आहेत आणि ते शेअर करत आहेत. तर मी माझं इन्स्टाग्राम अकाऊंट पब्लिक केलं. तर जास्तीत जास्त लोक मला फॉलो करू शकतील. मग आम्हाला आमच्या व्हिडीओंच्या मदतीनं पैसे मिळू लागले. त्यामुळे सचिन आणि त्याच्या कुटुंबाला आर्थित मदत देखील झाली.