Ambani Wedding in KUWTK : हॉलिवूडमध्ये झळकणार अनंत आणि राधिकाचा विवाह सोहळा!
Ambani Wedding in KUWTK : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही विवाहसोहळा हॉलिवूडमध्ये झळकणार
Ambani Wedding in KUWTK : गेल्या अनेक दिवसांपासून ज्या दिवसाची सगळीकडे चर्चा होती आज तो दिवस आला आहे. अर्थात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे आज 12 जुलै रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. त्या निमित्तानं जगभरातून पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात हॉलिवूडची लोकप्रिय कलाकार किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो कर्दाशियन हे देखील हजेरी लावणार आहेत. त्या दोघी काल म्हणजेच गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर अशात चर्चा सुरु आहे की अनंत आणि राधिकाचं लग्न आता हॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार आहे.
'इंडिया टुडे'च्या रिपोर्टनुसार, किम कर्दाशियन आणि तिची बहीण क्लो त्यांच्या The Kardashians या शोसाठी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची एक डॉक्युमेंट्री बनवतील. त्यामुळेच किम आणि क्लो यांच्यासोबत त्यांचे हेअरस्टायलिस्ट आणि फिल्मिंग प्रोड्युसर देखील त्यांच्यासोबत मुंबईत आले आहेत. ते यावेळी त्यांचा मुंबईतील संपूर्ण प्रवास आणि अंबानींचं लग्न शूट करतील. तर येणाऱ्या 6 व्या सीझनमध्ये हा शाही विवाहसोहळा आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.
मुंबईत लॅन्ड केल्यानंतर किमनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या सगळ्या व्यवस्थेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. सगळ्यात आधी तिनं पापाराझींचा एक व्हिडीओ शेअर करत हॅलो त्यासोबत तिनं भारताच्या झेंड्याचे इमोटिकॉन वापरले आहे. किम ही मुंबईतील ताज महाल हॉटेलमध्ये आहे. तिथे तिचे स्वागत फुलांचा हार गळ्यात घालत करण्यात आले.
अनंत आणि राधिका पारंपारिक हिंदू पद्धतीनं लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र-परिवार हजेरी लावणार आहेत. इतकंच नाही तर परदेशातून अनेक बडे नेते आणि उद्योगपती या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. काही सेलिब्रिटी हे काल भारतात आले आहेत तर काही आज येत आहेत.
हेही वाचा : अनंत -राधिकाच्या लग्न सोहळ्यामुळे मुंबईतील 'हे' रस्ते 4 दिवस बंद
मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये आज अनंत आणि राधिका हे सप्तपदी घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता वरातीत जाणारे सगळे लोक एकत्र येतील आणि भेटा बांधण्याचा विधीची सुरुवात होईल. त्यानंतर मिलनीचा विधी होईल यात लग्नस्थळी नवरदेव आल्यानंतर नवरीचे जवळचे नातेवाईक त्याचे स्वागत करतात. त्यासोबत त्याला भेट म्हणून वस्तू देतात. रात्री 8 वाजता वरमाळाच्या विधीला सुरुवात होईल. लग्न, सप्तपदी आणि सिंदूर दान या सगळ्या विधी रात्री 9.30 वाजता पार पडतील. तर लग्नासाठी भारतीय पारंपारिक ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे. 13 आणि 14 जुलै अशा दोन्ही दिवशी वेगवेगळ्या लोकांसाठी रिसेप्शनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.