Anant - Radhika Wedding LIVE: उरले काही क्षण! थोड्याच वेळात अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट आज 12 जुलै रोजी सप्तपदी घेणार आहेत. या लग्नात फक्त भारतातील नाही तर परदेशातूनही अनेक पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. तर हा शाही विवाह सोहळा लग्न मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटर येथे होणार आहे. 

Anant - Radhika Wedding LIVE: उरले काही क्षण! थोड्याच वेळात अनंत-राधिका अडकणार विवाहबंधनात

Anant Ambani Radhika Merchant Wedding Live Updates : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज 12 जुलै रोजी मुंबईच्या जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये सप्तपदी घेणार आहेत. मार्चपासून त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती कारण त्यावेळी जामनगरमध्ये पहिल्या प्री-वेडिंगचा कार्यक्रम झाला होता. त्यानंतर इटलीमध्ये दुसरं प्री-वेडिंग झालं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नात कोण येणार? कधी हे लग्न होणार? त्यासोबत या लग्नाचा मुहूर्त काय असेल याची चर्चा रंगली आहे. 

12 Jul 2024, 20:07 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: अनंत-राधिकाच्या लग्न सोहळ्यासाठी ओरी पोहोचला

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्न सोहळ्यासाठी ओरी पोहोचला आहे. ओरी त्याच्या खास लूकमध्ये दिसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 20:04 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: सलमान खानचा ट्रेडिशनल लुक

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्यासाठी अभिनेता सलमान खान पोहोचला. ट्रेडिशनल लुकमध्ये सलमानचा जबरदस्त लुक. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 19:42 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: रणवीरचा मुझसे शादी करोगी गाण्यावर डान्स

अनंत अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. या सोहळ्यामधील रणवीरचा मुझसे शादी करोगी गाण्यावरील डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी  जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 19:22 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: अनंतच्या लग्नाच्या वरातीत प्रियांकाचा डान्स

अनंत अंबानींच्या लग्नाच्या मिरवणुकीत रणवीर, निक जोनस आणि प्रियांका चोप्राच्या डान्स. लग्नाच्या वरातीचा आतला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 19:16 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: धक-धक गर्लचा सुंदर लुक

अभिनेत्री माधुरी दीक्षित मुंबईतील जिओ सेंटरमध्ये पोहोचली. अनंत-राधिकाच्या सोहळ्यासाठी माधुरीने लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यामध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 19:12 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: अनंत-राधिकाच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु

मुंबईतील जिओ सेंटरमध्ये अनंत-राधिकाच्या लग्नाचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. या सेलिब्रेशनमध्ये अनिल कपूर आणि इतर सेलिब्रिटी मस्त डान्स करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 18:51 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: संजय दत्त जिओ सेंटरवर पोहोचले

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नात सहभागी होण्यासाठी संजय दत्त मुंबईतील जिओ सेंटरमध्ये पोहोचला आहे. संजय दत्तने या सोहळ्यासाठी निळ्या रंगाच्या कुर्ता परिधान केला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 18:36 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: थोड्याच वेळात अनंत-राधिकाच्या विधीला सुरुवात

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विधीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. लग्न सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्याच्या डोक्यावर पगडी बांधण्यास सुरुवात झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 17:47 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: अभिनेत्री शनाया कपूर जिओ वर्ल्डमध्ये दाखल

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात सहभागी होण्यासाठी अभिनेत्री शनाया कपूर मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पोहोचली आहे. अभिनेत्रीच्या हटके लुकची होतेय जोरदार चर्चा.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

12 Jul 2024, 17:15 वाजता

Anant - Radhika Wedding LIVE: सोनेरी शेरवानीमध्ये अनंत अंबानी 

लग्नस्थळी अंबानी कुटुंब दाखल, दुल्हेराजा अनंत अंबानीचा सोनेरी शेरवानीमध्ये खास लुक. संपूर्ण कुटुंबाने वेषभूषा करून दुल्हेराजासोबत केलं फोटोशूट. अनंत अंबानी यांच्या गोल्ड शेरवानीने वेधलं सर्वांचं लक्ष.