अनंत-राधिका हनिमूनसाठी थांबलेल्या आलिशान रिसॉर्टचे भाडे किती? किंमत पाहून बसेल धक्का
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे सध्या गुआनाकास्ट येथे हनिमूनसाठी गेले आहेत. तेथील हॉटेलची एका दिवसाची किंमत पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. वाचा सविस्तर
Anant Ambani-Radhika Merchant Honeymoon: अनंत अंबानी आणि राधिका गुआनाकास्टेच्या सुंदर परिसरात असलेल्या कासा लास ओलास या आलिशान फोर सीझन रिसॉर्टमध्ये मुक्काम करत आहेत. हा रिसॉर्ट आलिशान सुविधा आणि सुंदर परिसरासाठी ओळखला जातो.
मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका 12 जुलै रोजी विवाहबंधनात अडकले आहेत. जगभरात अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. विवाह सोहळ्यानंतर अनंत -राधिका पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उपस्थित होते. त्यानंतर दोघे आता कोस्टा रिकामध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. एका रिपोर्टनुसार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 1 ऑगस्ट रोजी कोस्टा रिकाला पोहोचले आहेत.
हॉटेलचे भाडे किती?
एका रिपोर्टनुसार, नवीन जोडपे गुआनाकास्टच्या सुंदर परिसरात असलेल्या कासा लास ओलास या आलिशान फोर सीझन रिसॉर्टमध्ये राहत आहेत. हा रिसॉर्ट फक्त पाहुण्यांसाठी आहे. हा रिसॉर्ट त्याच्या आलिशान सुविधा आणि सुंदर परिसरासाठी ओळखला जातो. या रिसॉर्टमध्ये राहण्याचा खर्च प्रति दिवस 25 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
कासा लास ओलास हे प्रीटा खाडीकडे वळणारे एक अद्भूत रिसॉर्ट आहे. त्यात शहरातील लक्झरी आणि घरातील सुखसोयी आहेत. त्यात बरीच मोकळी जागा, खजुरीची झाडे आणि उष्णकटिबंधीय अंगण आहे. बेडरुममध्ये विराडोर बीचचे खडक आणि पाण्याचे सुंदर दृश्य आहे. या ठिकाणी आधुनिक मीडिया रुम आणि एक मोठे मैदानी मनोरंजन क्षेत्र देखील आहे. या रिसॉर्टच्या मध्यभागी एक भव्य 100 फूट जलतरण तलाव देखील आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नाचा खर्च किती?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या सोहळ्याची जगभरात चर्चा सुरु आहे. या विवाह सोहळ्यासाठी ट्रम्प, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, जस्टिन बीबर आणि कार्दशियन बहिणींसह अनेक प्रसिद्ध पाहुणे उपस्थित होते. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या या लग्नाला 5000 कोटी रुपये खर्च झाल्याचं म्हटंल जात आहे.