Who Is Famous Singer Rihanna : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. मुकेश अंबानी यांचे गुजरातमधील मूळ गाव जामनगर या ठिकाणी अनंत व राधिकाच्या लग्नाआधीचे अनेक कार्यक्रम पार पडणार आहेत. अनंत अंबानी यांचा लग्नाआधीचे (प्री-वेडिंग) कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमात हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंतचे कलाकार परफॉर्म करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अमेरिकन पॉप सिंगर रिहाना दाखल झाली आहे. तिच्या टीमचे काही व्हिडीओही समोर आले आहेत. यात हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना तिच्या टीमसह जामनगरला पोहोचली आहे. यातील एका व्हिडीओत रिहानाची संपूर्ण टीम ही एअरपोर्टमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी ते मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असल्याचे दिसत आहे. 


तर एका व्हिडीओत गायिका रिहाना हिचे सामान पाहायला मिळत आहे. यात जवळपास सात ते आठ मोठे बॉक्स पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या रिहानापेक्षा तिच्या सामानाचीच चर्चा जास्त रंगली आहे. तिच्या सामानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन तिला ट्रोलही करण्यात येत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या असंख्य कमेंट्स पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर एकाने "असं वाटतंय की तिने संपूर्ण घराचेच शिफ्टींग केले आहे", अशी कमेंट केली आहे. तर एकाने "कोणीतरी हिला सांगा की ताई आपल्याला इथे कायमचे राहायचे नाही", असे कमेंट करत म्हटले आहे. तर एकाने "या ताई भारतात कायमस्वरुपी राहायला येणार आहेत का", असा प्रश्न विचारला आहे.  



प्रसिद्ध गायिका रिहाना नक्की कोण?


अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडींग सोहळ्यासाठी रिहानाला आमंत्रण देण्यात आले आहे. रिहाना ही आंतरराष्ट्रीय पॉप स्टार आहे. ती एक कॅरेबियन पॉप गायिका आहे. रिहानाचा जन्म 20 जानेवारी 1988 मध्ये बार्बाडोस या ठिकाणी झाला. तिचे ट्वीटरवर 108 मिलियन फॉलोअर्स आहेत. 'Don't stop the music', 'Love the way you lie', 'Umbrella' यांसारख्या अनेक हिट अल्बमसाठी तिला ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार असलेल्या रिहानाचे भारतातही लाखो चाहते आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, रिहानाची एकूण मालमत्ता 600 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 4 हजार 400 कोटी रुपये आहे. 


रिहाना ही फक्त पॉप गायिकाचं नाही तर एक चांगली अभिनेत्रीही आहे. हॉलिवूड फिल्म बॅटलशिप आणि Ocean's 8 या सारख्या अनेक चित्रपटात ती झळकली. रिहानाचा फॅन्टी (Fenty) नावाचा स्वतःचा फॅशन ब्रँडही आहे. रिहाना ही जगभरातील अनेक संवेदनशील मुद्द्यावर भाष्य करत असते. काही वर्षांपूर्वी रिहानाने भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबद्दल ट्वीट केले होते. त्यामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.