Ananya Panday confirms her relationship with Aditya Roy Kapoor : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहरची 'कॉफी विथ करण 8' एपिसोडमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. यावेळी ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसतात. दरम्यान, आता प्रदर्शित होणाऱ्या आगामी एपिसोडमध्ये सारा अली खान आणि अनन्या पांडे दिसणार आहेत. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अनन्या तिच्या लव्ह लाइफविषयी मोठा खुलासा करताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, 'कॉफी विथ करण 8' च्या त्या एपिसोडमधून एक गोष्ट समोर आली आहे की अनन्या ही तिच्या रिलेशनशिपला जाहिरपणे सांगण्यास तयार आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओत करण जोहर हा साराला या विषयी विचारताना दिसतो त्यावर सारा अली खाननं जे उत्तर दिलं त्यावरून हे स्पष्ट झालं आहे की अनन्याचं A कनेक्शन म्हणजेच आदित्य रॉय कपूरकडे इशारा केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


करण जोहर साराला विचारतो की अशी कोणती गोष्ट आहे जी अनन्याकडे आहे आणि तुझ्याकडे नाही. त्यावर उत्तर देत सारा म्हणजे - ‘A नाइट मॅनेजर’. सारानं दिलेलं उत्तर ऐकताच अनन्या लाजते आणि बोलते की मला अनन्या कॉय कपूर असल्याचं वाटतं आहे. 'कॉफी विथ करण 8' च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या प्रोमोतील ही गोष्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यावरून आता असे म्हटले जात आहे की अनन्यानं तिच्या रिलेशनशिपची हिंट दिली आहे. नुकतंच अनन्या तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदिव्सला गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर देखील असल्याचे म्हटले जात होते. 


हेही वाचा : रेव्ह पार्टीच्या वादाच सलमान खाननं एल्विश यादवला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला


दरम्यान, या शोमध्ये कोणते कलाकार पाहायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तानं काजोल आणि रानी या दोघी पाहायला मिळणार आहेत. तर त्यासोबत रोहित शेट्टी आणि अजय देवगण देखील दिसणार आहेत. या सेलिब्रिटींशिवाय या शोमध्ये वरुण धवन, 'द आर्चीज'ची कास्ट, आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर दिसण्याची शक्यता आहे.