Salman khan advice for elvish yadav : 'बिग बॉस ओटीटी 2' विजेता एल्विश यादवनं आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस 17' मध्ये एन्ट्री केली आहे. यावेळी तो मनीषा रानीसोबत पोहोचला होता. या दरम्यान. एल्विश आणि सलमान या दोघांनी खूप गप्पा मारल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी निगेटिव्ह पीआरविषयी देखील चर्चा केली आहे. यानंतर सलमाननं एल्विशला निगेटिव्ह पीआरवरून एक खास सल्ला दिला आहे.
व्हिडीओत एल्विशनं सलमान खानला विचारलं की त्यानं काही दिवसांपूर्वी ट्रॉफी परत करण्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हा एल्विश म्हणाला की 'अशी निगेटिव्हिटी फेल झाली होती, माझ्याविषयी मिम्स बनत होते. माझ्या विरोधात निगेटिव्हिटी पसरत सुरु होती तर मी म्हणालो की बघा जर ट्रॉफीसाठी हे सगळं सुरु असेल तर माझ्याकडून ट्रॉफी घेऊन टाका आणि हे सगळं बंद करा.' एक व्यक्ती कोणत्या वरच्या स्थराला पोहोचली की इतरांना त्रास होतो तर याचा अर्थ आहे की तुम्ही या गोष्टीचा विचार करायला सुरुवात करायला हवी की तुम्ही असा विचार करायला हवा की तुम्ही यशाच्या शिखरावर आहात. सक्सेसफुल झालोय त्यामुळे इतरांविषयी विचार करू नका.
Salman Khan advised Elvish Yadav aap successful ho ye sab baat ki parvah mat karo (on negative PR).pic.twitter.com/oN4weTCV3p
— #BiggBoss_Tak (@BiggBoss_Tak) November 3, 2023
दरम्यान, माहितीनुसार, एल्विशवर नोएडाच्या सेक्टर 49 येथे धाड टाकत 5 लोकांना अटक केलं आहे. पोलिसांनी या ठिकाणांहून 5 कोब्रा आणि 1 अजगर जातीचे विषारी साप जप्त केले आहेत. त्यासोबत त्याचं विष देखील तिथे मिळालं आहे. जेव्हा जप्त केलेल्या लोकांची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा की बिग बॉस ओटीटी विजेत एल्विश यादवचं नाव समोर आलं आहे. पोलिसांनी एल्विश विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर खरंच एल्विश हा रेव्ह पार्टी गॅंगचा सदस्य आहे की नाही याचा शोध घेत आहेत. यावर स्पष्टिकरण देत एल्विश म्हणाला, मी सकाळी उठलो आणि मी पाहिलं की माझ्या विषयी फेक न्यूज पसरत आहे. त्यात म्हटलं आहे की एल्विशला अटक करण्यात आली आहे. मी यूपी पोलीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांना सांगायचं आहे की जर माझी एक पर्सेंट सुद्दा त्यात इन्वॉल्मेंट मिळाली तर मी संपूर्ण जबाबदारी घेण्यास तयार आहे. मीडियाकडे माझी एक विनंती आहे की जो पर्यंत तुमच्याकडे खूप काही पुरावे नाहीत तो पर्यंत खोटी बातमी पसरवू नका, कृपया माझी इमेज खराब करू नका.'