मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेता अंकित राजनं (Ankit Raj) 'हिंदुत्व' (Hindutva) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केलं आहे. अंकितनं छोट्या पडद्यावर 10 वर्षां पेक्षा जास्त काळ काम केलं आहे. याशिवाय त्यानं मॉडेलिंगही केली आहे. चित्रपटात पदार्पण करत असताना त्यानं छोट्या पडद्याला रामराम करत नसून ब्रेक घेतल्याचे स्पष्ट केले आहे. अंकित हा गेल्या अनेक दिवसांपासून एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण जेव्हा त्याची गर्लफ्रेंड अंकितला ऑनस्क्रिन इंटीमेट सीन करू नकोस असं म्हणाली तेव्हा त्यानं चक्क ब्रेकअप केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अंकितनं स्वत: हा खुलासा केला आहे. 


पाहा काय म्हणाला अभिनेता...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अंकितनं त्याचा Love Life विषयी खुलासा केला आहे. 'खासगी आयुष्य खूप सुंदर सुरु आहे. रिलेशनशिप नाही तर तणाव देखील नाही. मी या आधी हॅपी रिलेशनशिपमध्ये होतो. पण तरी सुद्धा रिलेशनशिपशिवाय मी खूप आनंदी आहे कारण मी स्वतःवर आणि माझ्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो. एखाद्याला रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे की नाही, ही त्याची निवड आहे कारण आपल्या इंडस्ट्रीत समविचारी लोक मिळाले नाहीत सगळं अवघड होऊन जातं.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अंकित पुढे म्हणाला, 'मी एका मुलीला डेट करत होतो, पण ती मला ऑनस्क्रीन इंटिमेट सीन करु नकोस असं सांगत होती. या विषयी अंकित म्हणाला की, 'ती म्हणाली की तू ऑनस्क्रीन इंटिमेट असणं मला आवडत नाही. पण मला माझ्या कामात अशी बंधनं नको आहेत. मला वाटतं या गोष्टी अतिशय ऑरगॅनिक आहे. जेव्हा प्रेम होणार असेल तेव्हा होईल आणि मला लग्न करायला काहीच हरकत नाही.' (Ankit Raj Says He Is Single and Broke With Girlfriend As She Was not okay with his Intimate Onscreen) 


हेही वाचा : 'हे अमिताभ बच्चन स्वतःला काय समजतात...', Big B नं वर का रागवतात चाहते


अंकित पुढे म्हणाला की, त्याला मागच्या वर्षी 'बिग बॉस'ची ऑफर मिळाली होती आणि यावेळीही. पण तो बिग बॉससाठी पात्र आहे की नाही या विचाराने तो गोंधळून जातो. मात्र, संधी मिळाल्यास 'खतरों के खिलाडी' हा रिअॅलिटी शो करायला आवडेल.' दरम्यान, 'कुबूल है', 'इश्कबाज' आणि 'ये प्यार नहीं तो क्या है' सारख्या मालिकांमध्ये अंकितनं काम केलं आहे.