'हे अमिताभ बच्चन स्वतःला काय समजतात...', Big B नं वर का रागवतात चाहते

Kaun Banega Crorepati 14 मध्ये Amitabh Bachchan यांनी स्पर्धकाशी बोलताना हा मोठा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 21, 2022, 12:20 PM IST
'हे अमिताभ बच्चन स्वतःला काय समजतात...', Big B नं वर का रागवतात चाहते title=

मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) सीझन 14 हा सध्या सतत चर्चेत आहे. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. एपिसोडच्या नवीन प्रोमोमध्ये अमिताभ त्यांच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल सांगताना दिसत आहेत. शूटिंग संपल्यानंतर त्यांनी कोणतं काम केलं नाही की लोक त्यांच्यावर नाराज होतात याचा खुलासा केला आहे.  

पाहा काय म्हणाले अमिताभ बच्चन -

या व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अमिताभ बोलतात की 'हा गेम संपताच मी सर्वांसोबत फोटो काढतो. कारण आम्हाला या लोकांना तयार करायचे असते, उद्या हे लोक पुन्हा येतील की नाही... हे लोक आमचे ग्राहक आहेत, त्यांच्याशिवाय आमचे दुकान चालत नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अमिताभ बोलतात, 'हे लोक त्यांच्यासोबत जे काही वस्तू आणतात ते आम्हाला दान म्हणून देतात. इथून मी माझ्या खोलीत जातो, तिथे सगळ्यांना ऑटोग्राफ देण्यासाटी एक मोठा गठ्ठा असतो. त्या सगळ्यावर ऑटोग्राफ करण्यासाठी दीड ते दोन तास लागतात, ऑटोग्राफ दिला नाही तर वाईट वाटतं.' (amitabh bachchan shares schedule after shooting of kbc kaun banega crorepati says if he do not do this thing people gets angry) 

हेही वाचा : Govinda Naam Mera Trailer: कॉमेडी आणि मर्डर सस्पेंस घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय विकी कौशल

पुढे अमिताभ बोलतात, 'हे अमिताभ बच्चन स्वतःला काय समजतात माहित नाही, त्यांना ऑटोग्राफ करायला पुस्तक दिलं होतं, त्यांनी ऑटोग्राफ दिला नाही... या लोकांमधले बरेच लोक पुन्हा येतात आणि बोलतात की सर गेल्या वेळी आम्ही तुम्हाला काही वस्तू दिल्या होत्या, त्या तुम्ही वापरल्या की नाही...' अमिताभ अशा प्रकारे स्पर्धकाशी मस्करी करत असतात आणि स्पर्धकावर असलेलं प्रेशर कमी करत असतात.