मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाचा बहार आलाय. सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता सिंगल होती मात्र आता ती बिझनेसमन विक्की जैनला डेट करतेय. विक्की बॉक्स क्रिकेट लीगचा मुंबई टीमचा सहमालक आहे. गेल्या वर्षी होळीपासून यांच्या अफेयरची चर्चा सुरु होती. मात्र स्पॉटबॉयच्या मते दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. वेबसाईटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांसोबतच्या नात्याबाबत सीरियस आहेत. दोघेही एकाच सोसायटीमघ्ये राहतात आणि एकमेकांसोबत हँगआऊटही करतात. त्यांच्या या अफेयरबद्दल जवळच्या मित्रांना माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दोघांनाही या नात्याचा अद्याप खुलासा करायचा नाहीये. विक्की जैनआधी अंकिता सुशांतला डेट करत होती. रिपोर्ट्सनुसार २०११मध्ये या दोघांनी साखरपुडाही केला होता. दोघांचीही पवित्र रिश्ताच्या सेटवर भेट झाली होती. सुशांतने आपल्या ब्रेकअपची माहिती ट्विटरवरुन दिली होती.



सुशांत सध्या क्रिती सॅनॉनला डेट करतोय. विक्की २०१२मध्ये टिया वाजपेयीला डेट करत होता. टियाने हाँटेड ३डी आणि '1920: इविल रिटर्न्स' मध्ये काम केले होते. अंकिता लवकरच मणिकर्णिका या बॉलीवूड सिनेमातून पदार्पण करतेय. सिनेमात तिने कंगना रनौतच्या बहिणीची भूमिका साकारलीये.