`लाज वाटायली हवी, मंदिरात...`; देवळात जाताना कपड्यांमुळे अंकिता लोखंडे ट्रोल
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त...
Ankita Lokhande Viral Video: 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अंकिता सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी अंकिता तिच्या डान्स व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. मात्र, आता तिचं चर्चेत येण्याचं कारण काही दुसरंच आहे. अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचं कारण म्हणजे अंकितानं मंदिरात जाताना परिधान केलेले कपडे. ते पाहून तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
अंकिता लोखंडेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत अंकिताच्या हातात बॅन्डेड केल्याचं दिसत आहेत. तर शॉर्ट्स आणि ओव्हर साइज टी-शर्ट घातलेली अंकिता घाईत गाडीत बसताना दिसते. अंकिताच्या हाताला असलेलं फ्रॅक्चर पाहून पापाराझी अंकिताला सतत विचारताना दिसतात की कशी आहेस आता आणि हाताला काय झालंय. पापाराझींना पाहून अंकिता स्वत: ला कॅमेऱ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करताना दिसते. ती हसत बोलते की 'यार मंदिरात आले होते.' पापाराझींच्या प्रश्नावर पुढे अंकिता म्हणाली, 'फ्रॅक्चर झालंय, लागलंय.'
हेही वाचा : VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!
अंकिता लोखंडेनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताच्या लूकवर तिला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांना अंकिताचं शॉर्ट्समध्ये मंदिरात जाणं आवडलेलं नाही. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की 'हात फ्रॅक्टर आहे... विकीशी भांडण झालं असेल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'लाज वाटायली हवी, मंदिरात शॉर्ट्स परिधान करुन जाते.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मंदिरा येण्यासाठी दुसरे कपडे परिधान करु शकत नाही का?' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हेअर स्टाइल चांगली वाटत नाही आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे. तिसरा म्हणाला, शॉर्ट्स घालून मंदिरात देवा.'