VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ!

Gaurav More Madness Machayenge Show :गौरव मोरेनं 'मॅडनेस मचाएंगे'च्या स्टेजवरच केली अंघोळ... तर हे पाहताच मल्लिका म्हणाली...

दिक्षा पाटील | Updated: May 16, 2024, 05:09 PM IST
VIDEO : गौरव मोरेनं चक्क मल्लिका शेरावत समोर स्टेजवरच केली अंघोळ! title=
(Photo Credit : Social Media)

Marathi Actor Gaurav More in Madness Machayenge Show: 'हास्यजत्रा फेम' अभिनेता गौरव मोरेनं सगळ्यांच्या मनात छाप सोडली आहे. गौरव वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी गौरवनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो सोडत असल्याचा खुलासा केला. तर आता गौवर मोरे हा 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये दिसत आहे. या शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावत दिसली. त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 

या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्या प्रोमोमध्ये गौरव हा 'मय्या मय्या' या मल्लिका शेरावतच्या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. गौरव एकेक करुन त्याचं शर्ट काढतो आणि फक्त बॉडीवर धमाल नाचताना दिसतोय. गौरव स्वतःवर पाणी ओततो. तर सेटवर गौरव सगळ्यां समोर अंघोळ करताना दिसतोय. हे सगळं पाहून मल्लिकाला हसू अनावर झालं. इतकचं नाही तर मल्लिकाही एक तांब्या पाणी त्याच्यावर टाकते. हे सगळं पाहिल्यानंतर मल्लिका त्यावर प्रतिक्रिया देते की 'मी आजवर 'मय्या मय्या' गाण्याचे इतके वर्जन पाहिले आहेत. पण तू केलेलं कमाल आहे. तुम्ही पलिकडे आहेत.' असं म्हणतं मल्लिका गौरवचं कौतुक करताना दिसते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : कोकणातील पहिला पाऊस ..., 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्यानं शेअर केला गावचा खास व्हिडीओ

दरम्यान, गौरव मोरेचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे तर काही नेटकऱ्यांनी वाईट वाटत असल्याचं म्हटलं आहे. एक नेटकरी म्हणाला, 'नाय यार गौऱ्या'. दुसरा नेटकरी म्हणाला की 'अरे देवा....हे काय करून ठेवले आहे गौरव मोरेचे'. तिसरा नेटकरी म्हणाला, 'कशासाठी एवढं ही कॉमेडी नाही गौरव'. आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हे सर्व करून शांत झोप लागते का... मी तर वेडा झालो असतो'. दुसरा नेटकरी म्हणाला, 'हो हो हो तुमची कॉमेडी …..हिथं गाडू हा हा हिथं गाडू .. बकवास भंकस एकदम.. जोकर झालाय पार तुझा.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'मराठीमध्ये खरंच शानमध्ये होता... हिंदी चॅनलवाल्यांनी काय करून ठेवलंय. मोठं काही करण्याच्या नादात काय करुन ठेवलंय... प्रशांत दामलेंसारखे मोठे अभिनेते पण आज नाटकात काम करतात पण प्रसिद्धी अजूनही तशीच आहे.'