Annu Kapoor : बॉलिवूड अभिनेता अन्नू कपूर यांचं खासगी आयुष्य त्यांच्या कामाप्रमाणेच चर्चेत रहायचं. अन्नू कपूर यांनी दोन वेळा लग्न केलं. मात्र, त्यांच्या लग्नातील एक किस्सा तर असा आहे जो ऐकूण तुम्हालाही आश्चर्य होईल. दुसऱ्या लग्नानंतर अन्नू कपूर यांचं एका मुलीसोबत अफेअर सुरु होतं. कोणालाही काहीही माहिती मिळाली नाही किंवा कधी कळलं नाही की ती मुलगी नक्की कोण होती. पण तुम्हाला माहितीये का? अन्नू कपूर यांचं हे अफेयर त्यांच्या एक्स वाईफसोबतचं होतं. मग काय अन्नू कपूर यांनी त्यांच्या एक्स वाइफसोबत पुन्हा लग्न केलं. चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्नू कपूर यांचा जन्म एका पंजाबी कुटुंबात झाला होता. त्यांचं कुटुंब सुरुवातीला आर्थिक समस्यांचा सामना करत होतं. त्यांची परिस्थिती इतकी खराब झाली की त्यांनी कधी चहा विकून पैसे मिळवले. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी 'एक रुका हुआ फैसला' हे नाटक केलं. त्यांनी त्या नाटकात 70 व्या वर्षांच्या एका वृद्धची भूमिका साकारली होती. याच भूमिकेनं अन्नू कपूरनं चित्रपटसृष्टीचे दरवाजे उघडे झाले. 


हेही वाचा : पाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल 


अन्नू कपूर यांचं दुसरं लग्न!


अन्नू कपूर यांचं खासगी आयुष्या हे प्रोफेशन्ल आयुष्या पेक्षा जास्त चर्चेत होतं. खरंतर अन्नू कपूर यांनी पहिलं लग्न अनुपमा नावाच्या एका मुलीशी केलं होतं. ज्या त्यांच्यापेक्षा वयानं 13 वर्षांनी लहाण होत्या. तर 1992 मध्ये लग्नाच्या बरोबर एका वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 1995 मध्ये अन्नू कपूर यांनी बंगाली अभिनेत्री अरुणिता मुखर्जी यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना एक मुलगी देखील आहे. या दरम्यान, त्यांचं एका मुलीसोबक अफेअर असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अन्नू कपूर यांच्या शिवाय कोणालाही माहित नव्हतं की ती मुलगी आहे तरी कोणं? तर ती त्यांची एक्स वाइफ अनुपमा होती. अन्नू कपूरच्या या धोक्यानं दुसरी पत्नी अरुणिता यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2005 मध्ये अन्नू कपूर आणि अरुणिता यांचा घटस्फोट झाला. तर त्यानंतर त्यांनी 2008 मध्ये पुन्हा एकदा अनुपमासोबत लग्न केलं.