पाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल

Palak Tiwari Pakishtani Designer Faiza Saqlain : पलक तिवारीनं पाकिस्तानी डिझायनर फैजाच्या नवीन कलेक्शनसाठी केलं फोटो शूट, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

दिक्षा पाटील | Updated: Feb 21, 2024, 02:25 PM IST
पाकिस्तानी ब्रँडसाठी मॉडेल होणं श्वेता तिवारीच्या लेकीला पडलं महागात! नेटकऱ्यांकडून पलक ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Palak Tiwari Pakishtani Designer Faiza Saqlain : बॉलिवूड अभिनेत्री आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीचे लाखो चाहते आहेत. पलक ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सध्या पलक चर्चेत असण्याचं कारण काही दुसरंच आहे. पलकनं एका पाकिस्तानी डिझायनरसाठी एक जाहिरात शूट केली. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. पलकनं पाकिस्तानी डिझायनर फैजा सक्लेनच्या लेटेस्ट कॅम्पेन ‘लिलियाना’ साठी फोटो शूट केलं आहे. त्याचे फोटो स्वत: फैजानं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. 

फैजानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. त्यात पलकनं लॉन्ग सूट, स्वीवलेस शर्ट आणि सिल्क ओढणी असा लूक केला आहे. या हटके आउटफिट्समध्ये फैजा खूप सुंदर दिसत आहे. या फोटोंमधील पलकचा लूक काही नेटकऱ्यांना प्रचंड आवडला तर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. पलकनं फक्त एकच ड्रेस परिधान करून फोटो शूट केलं नाही तर तिनं त्या कलेक्शनमधील वेगवेगळे कपडे परिधान करत हे फोटोशूट केलं आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पाकिस्तानी नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

पलकचे हे फोटो शूट पाहिल्यानंतर पाकिस्तानच्या काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, पाकिस्तानमध्ये अभिनेत्री नव्हत्या का? तिथून घेऊन आले. दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही पाकिस्तानी मुलींना ही संधी द्यायला हवी. तिसरा नेटकरी म्हणाला, भारतीयं या ब्रॅंडची जाहिरात करत आहेत पण त्याची थेट डिलिव्हरी भारतात होत नाही. आणखी एक नेटकरी म्हणाला, पाकिस्तानमध्ये कोणी मिळाल नाही का? दुसरा नेटकरी म्हणाला, तुम्ही पाकिस्तानमधील कोणत्या मॉडेलला घेतलं असतं तर बरं वाटलं असतं. तिसरा नेटकरी म्हणाला, बॉयकॉट बॉलिवूड, बॉलिवूड हे पाकिस्तानविरोधात नकारात्मक भावना पसरवत आहे आणि तुम्ही त्याच कलाकारांना प्रमोट करत आहात. 

 हेही वाचा : 'विरुष्का' नाव नाही ब्रँड आहे ब्रँड! विराट कोहली-अनुष्का शर्माची एकूण संपत्ती माहिती आहे का?

पलकच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.सध्या ती सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानला डेट करत असल्याच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. दोघं अनेकदा एकत्र स्पॉट होतात. त्याशिवाय तिचे आणि तिची आई श्वेताचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.