मुंबई : बॉलिवूडमध्ये सनी लियोनी ज्या टीव्ही शोमध्ये आली आणि एक वेगळी ओळख निर्माण केली त्या टीव्ही शोमध्ये आता आणखी एका पॉर्न स्टारची एन्ट्री होऊ शकते. पॉर्न स्टार म्हणून ओळखली जाणारी सनी आता एक अभिनेत्री म्हणून ओळखली जावू लागली आहे. सनी लियोनीने बॉलिवूडमध्ये चांगलं यश मिळवलं. अनेक दिग्गज कलाकारांसोबत तिने काम केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी सुरुवातीला अनेक वादांमध्ये होती. सनी लियोनी सुरुवातील बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिला चांगली प्रसिद्धी मिळाली होती. आतापर्यंत सनी लियोनीने बॉलिवूडमध्ये अनेकांचं मन जिंकलं आहे. पण आता सनी लिओनीला टक्कर देण्यासाठी बॉलिवूडमध्ये आणखी एका पॉर्न स्टारची एन्ट्री होऊ शकते. टीव्ही स्क्रीनवर डायनामाइटचा धमाका होऊ शकतो. टीवी रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये शांती डायनामाईट शोमध्ये सहभागी होऊ शकते अशी चर्चा आहे.



बिग बॉसचा नवी सीजन लवकरच सुरु होणार आहे. शांती डायनामाइट 'बिग बॉस-12' मध्ये कंटेस्टेंट म्हणून दिसणार आहे. जर असं झालं तर सनी लियोनीनंतर शोमध्ये भाग घेणारी शांती दूसरी पॉर्न स्टार ठरु शकते.