मुंबई : मलायका अरोरापासून घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान गर्लफ्रेंड जॉर्जियामुळे चर्चेत आहे. दुसरीकडे, जॉर्जिया बॉयफ्रेंड अरबाजला इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडत नाही. जॉर्जिया जेव्हा फोटो शेअर करते की तेव्हा काही मिनिटांत ते सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता अरबाजपेक्षा 22 वर्षांनी लहान असलेल्या जॉर्जियाने लाल रंगाच्या बिकिनीमध्ये असे फोटो शेअर केले आहेत की त्यांना पाहून अरबाज खानची झोप उडेल. या फोटोंमध्ये जॉर्जिया आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंमध्ये जॉर्जिया लाल रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये जॉर्जियाच्या मागे निळा समुद्र दिसत आहे, ज्यामुळे हा फोटो आणखी ग्लॅमरस होत आहे.


जॉर्जिया हिने बीचवर बिकिनी घालून फोटो क्लिक केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाचा गॉगल घालून तिचे सौंदर्य दाखवत आहे. हे फोटो पाहून चाहतेही बेभान होत आहेत. विशेष म्हणजे हे फोटो जॉर्जियाने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना जॉर्जियाने कॅप्शनमध्ये लिहिले – सॅलेंटो.



अरबाज खान 22 वर्षांनी मोठा


अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानी ही जोडी खूप लाइमलाइटमध्ये राहते. फार कमी लोकांना माहित असेल की अरबाज जॉर्जियापेक्षा 22 वर्षांनी मोठा आहे. अरबाज खान 54 वर्षांचा आहे, तर त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी 32 वर्षांची आहे.



हे दोघे अनेकदा रेस्टॉरंटमध्ये तर कधी फंक्शनमध्ये एकत्र दिसतात.