सलमानचा भाऊ आणि Malaika Arora चा पती असं लेबल मला दिलं; अरबाज खाननं व्यक्त केली खंत
अरबाज खान लवकरच `फौजा` या वेबसीरिजमध्ये दिसला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) म्हणतो की जेव्हा लोक त्याला फक्त सलमान खानचा भाऊ (Salman Khan) आणि मलायका अरोराचा (Malaika Arora) नवरा म्हणून ओळखतात तेव्हा त्याला ते आवडत नाही. अरबाज या विषयी बोलताना म्हणाला की तो लोकांचा दृष्टीकोन बदलू शकत नाही, पंरतु जेव्हा त्याला ओळखण्यासाठी दुसऱ्याचे नाव घेतले जाते, तेव्हा त्याला खूप वाईट वाटायचे. दरम्यान, तो आता या सगळ्या गोष्टीतून पुढे निघाला आहे.
अरबाज त्याला दिलेल्या टॅग विषयी काय म्हणाला पाहा
अरबाज गेल्या अडीच दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे. यादरम्यान, अरबाजनं काही हिट तर काही फ्लॉप चित्रपट दिले आहेत. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं त्याच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी मोकळेपणानं सांगितल्या आहेत. अरबाज म्हणाला, 'एक काळ असा होता जेव्हा मी माझ्या ओळखीविषयी खूप काळजी करायचो. मला हे खूप विचित्र वाटायचं की मला फक्त सलीम खानचा मुलगा आणि सलमान खानचा भाऊ किंवा मलायका अरोराचा पती म्हणून ओळखतात. आता मी मागे वळून पाहतो तेव्हा मला वाटतं की या गोष्टींचा काही अर्थ नाही.'
अरबाजने 1996 मध्ये 'दरार' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'प्यार किया तो डरना क्या', 'कयामत', 'गर्व' आणि 'मालामाल वीकली' यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यानं महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अरबाजनं 'दबंग' आणि 'दबंग 2' सारख्या चित्रपटांमध्ये अभिनेता आणि निर्माता म्हणून काम केलं आहे. अलीकडेच त्याची 'तनाव' ही वेबसिरीज 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाली आहे.
हेही वाचा : जान्हवी कपूरची सावत्र बहीण 'या' व्यक्तीला करतेय डेट, Arjun Kapoor ला याचा सुगावा आहे का?
दरम्यान, अरबाजनं ‘फौदा’ सीरिजमधील मिकी मोरेनोची भूमिका या सीरिजमध्ये साकारली आहे. पण 'तनाव'मध्ये अरबाजला पाहून मिकी मोरेनोची कॉपी असल्यासारख वाटायला नको म्हणून अरबाजनं स्वतःच्या लूकमध्ये बरेच बदल केले. या वेब सीरिजमध्ये अरबाज एका बंडखोरी विरोधी युनिटच्या कमांडरची भूमिका साकारत आहे. (Arbaaz Used To Be Worried About His Identity Said The Label Of Being Salman khan s Brother And Malaika s Husband Was Troubling me)