जान्हवी कपूरची सावत्र बहीण 'या' व्यक्तीला करतेय डेट, Arjun Kapoor ला याचा सुगावा आहे का?

अंशुलानं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Nov 16, 2022, 11:40 AM IST
जान्हवी कपूरची सावत्र बहीण 'या' व्यक्तीला करतेय डेट, Arjun Kapoor ला याचा सुगावा आहे का? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची (Arjuna Kapoor) बहिण आणि निर्माता-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney kapoor) यांची मुलगी अंशुला कपूर (Anshula Kapoor) ही चित्रपटसृष्टीत नसली तरी तिचे लाखो चाहते आहेत. अंशुला ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अंशुलानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून त्यामुळे ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु केल्या आहेत. 

हेही वाचा : Karan Johar ला 'या' स्टार किडनं मोठा धक्का, मांडीवर खेळवलं त्यानंच लॉन्चच्या ऑफरला नकार!

वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काय म्हणाली अंशुला -

अंशुलानं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अंशुला रोहन ठक्करसोबत दिसत आहे. दोघेही एकत्र व्हेकेशनचा आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहनच्या वाढदिवसानिमित्तानं अंशुलानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. रोहनला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीओ शेअर करत अंशुला म्हणाली, 'माझ्या सगळ्यात जास्त आवडत्या पुरुषाला..., जो माझ्या आयुष्याभोवती फिरतो आणि हे सत्य आहे.' या व्हिडीओत अंशुला आणि रोहन गोड हसताना दिसत आहेत. (Anshula Kapoor Boyfriend) 

पाहा अंशुलाचा व्हिडीओ -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंशुलाच्या जवळच्यांनी दिल्या रोहनला शुभेच्छा -

अंशुलाच्या या पोस्टवर मलायका अरोरानेही रोहनला शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर अंशुलाचे काका संजय कपूर यांनीही रोहनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व प्रकारानंतर अंशुला कपूर आणि रोहन ठक्कर रिलेशनशिपमध्ये (Anshula Kapoor and Rohan Thakkar) असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. (janhvi kapoors step sister and arjun s sister anshula is dating this man) 

दरम्यान, अंशुलाने कधीही चित्रपटात काम करण्याचा विचार केला नाही. स्टार किड असूनही ती फिल्मी जगापासून दूर राहणे पसंत करते. अंशुला स्वतःचा व्यवसाय करते, तसेच ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अंशुला अनेकदा तिच्या कुटुंबियांसोबत नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.