मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला जबर धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवींचा दुबईत टबबाथामध्ये बुडून मृत्यू झाला. श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन


श्रीदेवींचा दुबईत मृत्यू  


अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू दुबईत झाला. तेथे मोहित मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी सहपरिवार गेल्या होत्या. त्यानंतर बोनी कपूर आणि त्यांची मुलगी परतली होती. मात्र पेंटिंग एक्झिबिशनमध्ये काही फोटोंचा लिलाव होता. त्यासाठी श्रीदेवी दुबईत राहिल्या होत्या. 


24 फेब्रुवारीच्या रात्री मात्र अचानक श्रीदेवीच्या मृत्यूचे वृत्त येऊन थडकले. श्रीदेवींच्या अकाली जाण्याने श्रीदेवींच्या चाहत्यांप्रमाणेच कपूर कुटुंबियालाही धक्का बसला. श्रीदेवीला मोगऱ्याने सजलेल्या गाडीतून दिला अखेरचा निरोप


अर्जून कपूर आणि श्रीदेवींमध्ये होता दुरावा 


अर्जून कपूर हा बोनी कपूरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन श्रीदेवींशी लग्न केले होते. त्यामुळे अर्जून कपूर आणि त्याच्या बहिणीचे श्रीदेवींसोबत जिव्हाळ्याचे संबंध नव्हते असे अर्जून कपूरने मुलाखतीमध्ये सांगितले होते.  श्रीदेवीने काकाला सांगितली होती मनातली गोष्ट, ‘बोनीचा मुलगा अर्जुनसोबत होती समस्या’


शूटींग सोडून अर्जून मुंबईत दाखल  


श्रीदेवींच्या निधनाचे वृत्त समजाताच अभिनेता अर्जून कपूर पंजाबमधील 'नमस्ते इंग्लंड' या चित्रपटाचे शूटींग अर्धावट सोडून मुंबईत तात्काळ परतला होता. अनिल कपूर यांच्या घरी श्रीदेवींच्या मुलीला आधार दिल्याचे वृत्त आहे.  


दुबईत श्रीदेवींचा मृतदेह मिळण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता तो बोनी कपूरच्या मदतीलाही दुबईत पोहचला होता. त्यानंतर श्रीदेवींच्या अंतिम दर्शनाच्या यात्रेदरम्यान सजवलेल्या खास वाहनामध्येही अर्जुन कपूर कुटुंबीयांसह दिसला. श्रीदेवींच्या पार्थिवाला बोनी कपूर यांनी मुखाग्नी दिला. श्रीदेवीच्या मृत्यूनंतर काय झाली बोनी कपूरांची अवस्था ? हे देखील जाणून घ्या.