श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन

बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचे केवळ फॅन्स नव्हे तर सगळ्यांना धक्का बसलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Feb 28, 2018, 08:57 AM IST
श्रीदेवीप्रमाणेच या कलाकारांचेही देशाबाहेर झाले होते निधन title=

मुंबई : बॉलीवूडची सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत शनिवारी रात्री आकस्मिक निधन झाले. श्रीदेवींच्या अचानक जाण्याने त्यांचे केवळ फॅन्स नव्हे तर सगळ्यांना धक्का बसलाय.

श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीदेवीप्रमाणेच बॉलीवूडचे असे अनेक स्टार्स आहेत ज्याचे देशाबाहेर निधन झाले होते. 

फारुख शेख - प्रसिद्ध अभिनेता फारुख शेख यांचे दुबईत निधन झाले होते. 27 डिसेंबर 2013मध्ये फारुख यांच्या निधनाची बातमी आली होती. 65वर्षीय अभिनेता एका कॉन्सर्टमध्ये भाग घेण्यासाठी गेले असता तेथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. 

देव आनंद - बॉलीवूडचे देव आनंद यांनी अखेरचा श्वास देशाबाहेर घेतला होता. 3 डिसेंबर 2011च्या रात्री देव आनंद यांचा लंडनमध्ये हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. ते 88 वर्षांचे होते. जेव्हा त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा त्यांचा मुलगा सुनील त्यांच्यासोबत होता. 

मुकेश - सुप्रसिद्ध गायक मुकेश यांचेही निधन अमेरिकेच्या डेट्रॉईट शहरात झाले होते. 27 ऑगस्ट 1976मध्ये वयाच्या 53व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. 

मेहमूद - अभिनेता मेहमूद यांचेही निधन देशाबाहेर झाले होते. 71 वर्षीय मेहमूद यांचे निधन अमेरिकेच्या डेन्मोर शहरात झाले. झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.