मुंबई : अभिनेत्री श्रीदेवीच्या मृत्यूमुळे भारतापासून ते दुबईपर्यंत मीडियात एकच खळबळ उडालीये.
दुबई सरकारने सांगितले की, श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून झालाय. यावर काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे श्रीदेवीच्या जाण्याने देशभरातील तिचे चाहते दु:खी झाले आहेत. अशातच श्रीदेवीचे काका एम. वेणुगोपाल यांनी एक मोठा खुलासा केलाय.
तेलगु वृत्तपत्र ‘साक्षी’ला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवीच्या काकांनी सांगितले की, ‘ती खूप खोडकर स्वभावाची होती. काही दिवसांपूर्वीच तिची आणि माझी भेट झाली होती. त्यावेळी ती म्हणाली की, तशी तर जीवनात कोणतीही अडचण नाहीये. पण बोनीचा मोठा मुलगा अर्जुन कपूरसोबत सगळंकाही ठिक नाहीये’.
एम वेणुगोपाल यांनी सांगितले की, ‘श्रीदेवीने याबाबत कधीही बोनी कपूरसमोर उल्लेख केला नाही की, तक्रार केली नाही. तसेच श्रीदेवीने माझ्यासमोर कधीही बोनी कपूरबद्दल काहीही वाईट सांगितलं नाही. किंवा त्या दोघांमध्ये कोणतीही समस्या असल्याचं ती म्हणाली नाही.
बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव मोना कपूर होतं. त्यांना मुलगा अर्जुन कपूर आणि मुलगी अंशुला अशी दोन अपत्ये आहेत. बोनी आणि श्रीदेवीच्या लग्नाने कपूर खानदानात खळबळ उडाली होती. मीडिया रिपोर्टनुसार अर्जुन कपूर आणि श्रीदेवी यांच्यात संपत्तीवरून वाद होत होते.