मलायकाच्या कमाईचा आकडा मोठा; तुलना होताच चढला अर्जुनचा पारा
मलायकाच्या कमाईची तुलना अर्जुनसोबत....
मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट करण्यात आलं आहे. मलायका आणि अर्जुन दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली आहे. त्यामुळे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न सतत चाहत्यांकडून विचारला जात आहे. पण आता चर्चा रंगत आहे ती म्हणजे एका वेगळ्या कारणामुळे. मलायकाच्या कमाईचा आकडा अर्जुनपेक्षा जास्त आहे.
जेव्हा मलायकाच्या कमाईची तुलना अर्जुनसोबत व्हायला लागली, तेव्हा अर्जुन भडकला. त्याने यासंबंधी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील शेअर केली. पण काही वेळात त्याने ती पोस्ट डीलीट केली. याप्रकरणी अर्जुनने नाराजी देखील व्यक्त केली. पोस्टमध्ये अर्जुन कमाई संदर्भात आपलं मत मांडलं आहे.
अर्जुन म्हणाला, '2021 साली अशी हेडलाईन पाहून वाईट वाटत आहे. मलायकाची कमाई चांगली आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तिने अनेक वर्ष मेहनत केली आहे. त्यामुळे कोणासोबत तुलना करणं योग्य नाही.' रिपोर्ट्सनुसार मलायका आरोराची एकून कमाई 100 कोटी रूपयांच्या घरात आहे. तर अर्जुनची कमाई 88 कोटी रूपये आहे.
दरम्यान, सेलिब्रिटींच्या गर्दीत प्रकाशझोतात असणारी एक जोडी म्हणजे, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. प्रेमाच्या नात्याला वयाचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं बंधन नसतं हेच या दोघांनी सिद्ध केलं आहे. मुख्य म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जोडी त्यांच्या प्रेमाची 'खुल्लम खुल्ला' ग्वाही देतात.