Ajrun Kapoor Pet Death: अर्जुन कपूर हा आपल्या सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यातून मलायका अरोरासोबतच्या अफेअरमुळे तिची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते. यावेळीही त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. अर्जुन कपूर हा सोशल मीडियावर चांगलाच एक्टिव असतो. तो सोशल मीडियावर अनेक पोस्टही शेअर करताना दिसतो. यावेळी त्यानं अशीच एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. आपल्यासाठी आपला पेट हा खास असतो. कधी कधी आपलं सुख-दु:ख शेअर करायला कोणी नसतं तेव्हा आपण आपल्या पेटसमवेत अशा गोष्टी शेअर करतो. आपल्या पेटचे आपल्यासोबतचे असेच खास नाते असते. त्यामुळे अशावेळी आपले आणि त्याचे बॉण्डिंगही फार वेगळे असते. सध्या अशाच आपल्या एका लाडक्या पेटच्या मृत्यूनं अर्जुन कपूर खचला आहे आणि आपल्या या पेटसोबतचा त्यानं इमोशनल फोटो हा शेअर केला आहे. यावेळी त्यानं एक इमोशल पोस्ट शेअर केली आहे. पाहुयात नक्की काय आहे ती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानं या पोस्टमध्ये लिहिलंय की, ''माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला असा माझा बॉय. माझा मॅक्झीमस. तू सर्वात चांगला आणि तू सर्वात शूर असा आणि प्रेम देणारा होतास. मी तू खूप मिस करीन माझा बच्चा. आता आपलं घरं हे पहिल्यासारखं काही राहणार नाही. मला फार राग आलाय की तु आम्हाला अचानक सोडून गेलास.


आता मला कळतं नाहीये तुझ्याशिवाय घरात कसा बसून राहू जेव्हा तू आजूबाजूला नसशील. मृत्यू हा फार दु:खद क्षण आहे कोणासाठीही. यावेळी मात्र ही वेळ फार वेगळी वाटते आहे. तू मला आणि माझ्या बहिणीला खूप आनंद दिलास. प्रत्येक वेळी आनंदात, रागात सहभागी झालास. तुला ते सगळं मिळो. आता तू मस्त राहा. तुझ्या आत्माला शांती मिळो. भेटूच कधीतरी.''



मलायकाची कमेंट नाही? 


यावेळी या पोस्टवरून सध्या नेटकऱ्यांमध्येही संभ्रम आहे. यावेळी सगळ्या सेलिब्रेटींनी त्याचसोबत अर्जुन कपूरसोबत रोमान्स केलेल्या सर्वच अभिनेत्रींनी यावेळी त्याच्या या पोस्टखाली कमेंट केली आहे. परंतु मलायकाची मात्र काहीच कमेंट नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये फारच संभ्रम आहे. हे ब्रेकअपचे संकेत आहेत का अशाही चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरू झाली आहे. परंतु यावर कुठलीही पुष्टी दोघांकडून नाही.