मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. आर्यन खान एक दिवस एनसीबीच्या ताब्यात असेल. क्रूज ड्रग पार्टी प्रकरणात आर्यनची खूप वेळ तपासणी करण्यात आली. त्यानंतर 2 इतर साथीदारांसह त्याला अटक करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सगळ्या दरम्यान आर्यन खानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत एनसीबी आणि पोलीसांची टीम दिसत आहे. यानंतर आर्यन खानच्या आऊटफिटने सगळ्यांचं लक्ष केंद्रीत केलं. यानंतर त्याचा वेगळा लूक देखील समोर आलं आहे. 




कोण आहे अरबाज मर्चंट?


आर्यन खान ड्रग प्रकरणात अरबाज मर्चंटचे नाव वारंवार येत आहे. अरबाज फक्त आर्यनचाच नाही तर अनेक बॉलिवूड स्टार किड्सचा मित्र आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 30.5 K फॉलोअर्स आहे. अरबाजला या प्लॅटफॉर्मवर इरफान खानचा मुलगा बाबुल, पूजा बेदीची मुलगी आलाया फर्निचरवाला, चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेने फॉलो केलंय. अरबाजचा ड्रग्स पार्टीत खूप मोठा सहभाग असल्याचं म्हटलं जातं आहे.


NCB च्या अधिकाऱ्यांना कधी मिळाली होती टीप? 


आर्यन खानच्या नावाने कोणतीच वेगळी अशी रूम बूक नव्हती. मात्र आयोजकाने आर्यन खान आणि अरबाज मर्चंटकरता खास एक रूम आयोजित केली होती. जशी ही दोघं त्या खास कॉम्प्लीमेंट्री रूममध्ये जाऊ लागले तशी NCB छ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर धा़ड टाकली. 


ज्यावेळी त्या दोघांचा तपास कऱण्यात आला तेव्हा आर्यन खानकडे काहीच सापडलं नाही. मात्र अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये चरस सापडलं. NCB ने या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले. तेव्हा या दोघांमध्ये चरस घेण्यावरून चॅट झालं होतं. तसेच आर्यन खानने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं देखील आहे. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट ड्रग्स पॅडलरच्या संपर्कात असल्याची माहिती NCB च्या अधिकाऱ्यांना खूप आधीच मिळाली होती. NCB या शोधात अनेक दिवसांपासून होती.