Aaryan Khan Dating Pakistani Actress : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सध्या त्याच्या 'पठाण' (Pathaan) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत असताना. दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यन खान (Aaryan Khan) गेल्या काही दिवसांपासून नोरा फतेहीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातमीमुळे चर्चेत होता. तर आता पुन्हा एक आर्यन खान चर्चेचा विषय ठरला आहे. आता आर्यन एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय ही बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोरा फतेही (Nora Fatehi) आणि आर्यन खान यांचे दुबईतील पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. या बातमीवर आर्यन किंवा नोरा कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. इतक्यात आर्यन एका दुसऱ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाला आहेत. आर्यन एका पाकिस्तानी अभिनेत्रीला डेट करतोय असे म्हटले जात आहे. आर्यनचा पाकिस्तानी अभिनेत्री सादिया खानसोबतचा ( Sadia Khan) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा हा फोटो पाहून नेटकरी अंदाज लावत आहेत की ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. 



हेही वाचा : 'तो इतका खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो...', Mahesh Babu चा सावत्र भाऊ चौथ्यांदा चढला बोहाल्यावर!


आर्यन आणि सादियाचा हा व्हायरल फोटो फिल्मी वेव्ह या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यावेळी आर्यननं पांढऱ्या रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. तर सादिया खाननं काळ्या रंगाचा ड्रेस आणि जॅकेट परिधान केलं आहे. आर्यन आणि सादियाचा हा फोटो कुठला आहे आणि ते दोघं कोठे भेटले होते हे अद्याप समोर आले नाही. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर आर्यन नक्की कोणाला डेट करतोय असा प्रश्न पडला असून नोरा आणि सादियाचं नाव समोर आलं आहे. 


आर्यन डेट करत असलेली सादिया कोण आहे? 


सादिया खान ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे. गेल्या 11 वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. सादियानं छोट्या पडद्यावर आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. सादिया 'खुदा और मोहब्बत' या मालिकेमुळे प्रकाश झोतात आली होती. यानंतर सादिया 'खुदा और मोहब्बत 2', 'शायद', 'मार्यम पेरिरा' आणि 'अब्दुल्ला द फायनल विटनेस' यामध्ये दिसली. 


दरम्यान, नोरा फतेही सोबतच्या डेटिंगच्या चर्चा कशा सुरु झाल्या...


त्या दोघांनी एका व्यक्तीसोबत फोटो काढला होता. तिनं चाहत्यानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या चाहतीनं आर्यन आणि नोरा सोबतचे फोटो शेअर केले होते. या एकाच फॅनसोबत एका फोटोत नोरा तर दुसऱ्या फोटोत आर्यन खान दिसतो आहे. पण या फॅनसोबत त्या दोघांचा एकत्रित फोटो काही व्हायरल झालेला नाही.त्यामुळे यात किती सत्यता आहे हे माहित नाही.