मुंबई : गायक नेहा कक्कर आज प्रसिद्ध सेलिब्रिटींपैकी एक आहे. डिप्रेशनमध्ये गेलेल्या नेहाने ऐकेकाळी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा नेहाने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील लिहीली होते. नेहाची पोस्ट पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान नेहा 'इंडियन आयडल 10' (Indian Idol 10)चा स्पर्धक विभोर पाराशरला डेट करत असल्याची अफवा पसरली होती. या अफवांमुळे नेहाला मात्र प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अभिनेता हिमांश कोहलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा आणि विभोर यांच्या नावाची चर्चा रंगली. तेव्हा नेहा विभोरसोबत अनेक म्यूझीक कॉन्सर्ट करत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अफवांबद्दल जेव्हा नेहाला कळालं तेव्हा तिने आत्महत्या करण्याचा विचार करू लागली. त्यावेळी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत नेहा म्हणाली,  'ही पोस्ट लिहित आहे पण मी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या स्थिर नाही. मी सुद्धा कोणाची बहिण आणि मुलगी आहे, हा विचार लोक करत नाहीत. याठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक गोष्टींचा सामना आणि प्रचंड मेहनत केली आहे. अखेर लोक अशा अफवा का पसरवतात?' असा प्रश्न नेहाने सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केला. 


पुढे नेहा म्हणाली, 'कोणाच्या खासगी आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणं बंद करा. असं काही करू नका ज्यामुळे समोरचा व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाईल आणि आत्महत्येचा निर्णय घ्याल. तुम्ही एका मुलीचे वडील आणि भाऊ असाल तर तुमच्या मुलीबद्दल देखील असचं म्हणाल का? ज्यांना माझी चिंता वाटते  त्यांनी माझी काळजी करू नका मी लवकरचं ठिक होईल. जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर विचार बदला... '
 
हिमांशू कोहलीसोबत  ब्रेकअप झाल्यानंतर नेहाने गायक रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) सोबत लग्न केलं आहे. आता नेहा तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.