मुंबई : मायानगरीत स्वतःचं आणि हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण मेहनत करत असतो. गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी मुंबईत स्वतःचं वेगळं विश्व तयार केलं. त्यांच्या पाठोपाठ अभिनेता आणि गायक आयुष्मान खुराना आणि भाऊ अपारशक्ति खुराना दोघांनी नवीन घर घेतलं आहे. मुंबईच्या एका हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये दोघांनी घर खरेदी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार आयुष्मानने लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये Windsor Grande Residences च्या  20 मजल्यावर घर खरेदी केलं आहे. नव्या घरासाठी त्याने तब्बल 96 लाख 50 हजार रूपये स्टँप ड्यूटी भरली आहे. 



आयुष्मानच्या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ 4 हजार 27 स्क्वेअर फूट आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये चार वाहनांसाठी पार्किंगचीही सोय आहे.  आयुष्मानचा भाऊ  अपारशक्तिने देखील त्याचं ठिकाणी घर घेतलं. 


अपारशक्तिच्या नव्या घराची किंमत जवळपास सात कोटी रूपये आहे. नव्या घरासाठी अपारशक्तिने 35 लाख 25 हजार रूपये स्टँप ड्यूटी भरली आहे. त्याच्या अपार्टमेंटची नोंदणी डिसेंबर 2015 मध्ये झाली. महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये दोन वाहनांसाठी पार्किंगचीही सोय आहे.