Azaad Teaser: बॉलिवूड अभिनेता अजय देवनगचा भाचा अमन देवगन आणि रवीना टंडन हे लवकरच बॉलिवूडमध्ये धमाल करण्यासाठी येत आहेत. दोघांचा पहिला चित्रपट 'आझाद'चा टीझर रिलीज झाला आहे. 'आझाद' चित्रपटाच्या टीझरमध्ये घोड्याची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच या टीझरमध्ये तुम्ही अमनचा आवाज देखील एकू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आझाद' चित्रपटाचा टीझर रिलीज


नुकताच अमन देवगन आणि रवीना टंडन यांच्या पहिल्या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरची सुरुवात ही घोडेस्वरांच्या एन्ट्रीने होत आहे. त्यासोबत तो शत्रूसोबत लढताना देखील दिसत आहे. अशातच टीझरमध्ये एका महिलेचा आवाज ऐकू येत आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, त्या दिवशी महाराणा प्रताप यांची हल्दीघाटीमध्ये 8 ते 9 हजारांची फौज होती. तर दुसऱ्या बाजूला 40 हजार सैनिक होते. पण सर्वात खास घोडा हा स्वत: महाराणा प्रताप यांच्याकडे होता. जो एखाद्या हत्तीसारखा उंच, खूपच वेगवान आणि त्याने उडी मारली तर तो दरी देखील पार करू शकतो असा होता.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

यानंतर अमन त्या आजीला सांगतो की, तो या घोड्याला कधीच शोधू शकत नाही. त्यानंतर आजी त्याचे सांत्वन करत म्हणते की, जर तू घोड्याला शोधलं नाही तर घोडा तुला शोधेल. येथूनच अमन आणि राशा यांची कहानी सुरु होते. ज्यामध्ये अमन हा एक सामान्य मुलगा आणि घोडेस्वार आहे. तर राशाकडे पाहून असे वाटते की, ती एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी आहे. दोघेही टीझरमध्ये डान्स आणि रोमान्स करताना दिसत आहे. 


जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार चित्रपट 


त्यासोबतच या टीझरमध्ये अमन देवगनला अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. ज्यामध्ये त्याला साथ देण्यासाठी त्याचे काका अजय देवगन देखील असणार आहेत. चित्रपटात अजय देवगन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमन देवगन, अजय देवगनसह डायना पेंटी, पियुष मिश्रा आणि मोहित सारखे अनेक कलाकार दिसणार आहेत. 


अमन देवगन हा अजय देवगनच्या बहीण नीलम देवगनचा मुलगा आहे. तर रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या चित्रपटात अमनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरनंतर चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.