3 तासांचा चित्रपट, बजेट 2522 कोटी तर कमाई 18,970 कोटी रुपये, तुम्ही पाहिला का?

प्रत्येक वर्षी मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपट रिलीज होत असतात. आज अशाच एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, ज्याने जगभरात 18,970 कोटींची कमाई केली होती. ज्याचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकले नाही. 

Soneshwar Patil | Jan 29, 2025, 18:09 PM IST
1/7

दरवर्षी बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात. जे बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतात. परंतु काही मोजकेच चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करू शकतात. 

2/7

भारतात 100 किंवा 200 कोटींचा आकडा पार करणे ही कोणत्याही परदेशी चित्रपटासाठी मोठी गोष्ट आहे. पण 2019 मध्ये असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने हा ट्रेंड बदलला. 

3/7

या चित्रपटाने भारतात तब्बल 373 कोटी रुपयांची कमाई केली. इतकेच नाही तर या चित्रपटाने आमिर खानच्या 'पीके', 'जेलर', 'लिओ' सारख्या चित्रपटांच्या कलेक्शनलाही मागे टाकले होते. 

4/7

आम्ही 'अॅव्हेंजर्स एंडगेम' चित्रपटाबद्दल बोलत आहोत, जो एक अमेरिकन सुपरहिरो चित्रपट आहे. जो मार्वल कॉमिक्सच्या पात्रांवर आधारित आहे. 

5/7

या चित्रपटाच्या बजेटसंदर्भात बोलायचे झाले तर हा चित्रपट 2522 कोटी रुपयांमध्ये बनला होता. त्याच्या बजेटमुळे हा हॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. 

6/7

या चित्रपटाने जगभरात 18,970 कोटी रुपयांची कमाई केली होती. इतिहासातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाने स्थान मिळवले आहे. 

7/7

आजपर्यंत एकही चित्रपट या चित्रपटाचा विक्रम मोडू शकलेला नाहीये. IMDb च्या रेटिंग देखील 10 पैकी 8.4 आहे. हा चित्रपट तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x