मुंबई : प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून सर्वांची मनं जिंकणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता म्हणजेच ​​बबिता जी सध्या अडचणीत सापडली आहे. लवकरच तिला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खरंतर, ती तिच्या एका थ्रोबॅक वादग्रस्त व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ज्यामध्ये तिने जातीवाचक शब्द वापरले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होऊ शकते अटक
या व्हिडिओमुळे गेल्या वर्षी अभिनेत्रीचा खूप विरोध झाला होता. त्यानंतर तिने आपल्या वक्तव्यावर माफीही मागितली होती. मात्र यानंतरही आता हिसारच्या एका विशेष न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मुनमुन अडचणीत सापडली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण
2021 मध्ये मुनमुनने तिच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये तिने एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, जे थेट अनुसूचित जाती समुदायाला टारगेट करत होतं. व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसतेय की, 'मी यूट्यूबवर येत आहे, आणि मला भंगीसारखं नाही तर चांगलं दिसायचं आहे.' हा व्हिडिओ अपलोड होताच #ArrestMunmunDutta या ट्रेंडिंगला सुरुवात झाली होती.


वकिलांनी केलं मोठं वक्तव्य
एका बातमीनुसार, एक मुलाखत देताना, मुनमुन दत्ताचे वकील रजत कलसन यांनी खुलासा केला की, हिसारमधील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने बबिता जीची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली आहे. न्यायाधीश अजय तेओतिया यांनी तिचा जामीन फेटाळला. त्यामुळे अभिनेत्रीच्या अटकेची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अभिनेत्रीला अटक होतेय का हे याकडे सगळ्यांच लक्ष आहे.