Bachchan Family's Famous Holi Party : होळीला (Holi) दोनच दिवस शिल्लक आहेत. तरी आजपासून अनेकांनी होळी साजरी करण्यास सुरुवात केलू आहे. होळी म्हटलं की बॉलिवूडची होळी ही नेहमीच चर्चेचा विषय ठरते. बॉलिवूडची होळी पाहून लोक त्यांची होळीची पार्टी प्लॅन करतात. बॉलिवूडची होळी पार्टी म्हटलं की त्या पार्टीत अनेक गोष्टी घडतात. कधी कोणी त्याच्या एक्सला धडकतं तर कधी कोणात वाद होतो. तर बॉलिवूडच्या गाजलेल्या आणि नेहमीच चर्चेत असलेल्या होळी तुम्हाला माहितीये का? चला तर आज आपण अशाच एका होळी विषयी जाणून घेऊया...(Bollywood Holi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूडमध्ये गाजलेल्या होळींमध्ये आरके स्टूडियो, यश चोप्रआ आणि शाहरुख खानची होळी आहे. त्यात सगळ्यात जास्त गाजलेल्या आणि फेमस होळींपैकी एक म्हणजे बच्चन कुटुंबाची होळी आहे. हे सगळे त्यांच्या होळी पार्टीत संपूर्ण बॉलिवूडला बोलवतात. बच्चन कुटुंबाची होळी ही नेहमीच स्पेशल असते कारण या होळीत बिग बी आणि अभिषेक हे त्यांच्या घराच्या गेटवर थांबतात आणि येणाऱ्या पाहुण्यांना आधी ते कसे आहेत वगैरे प्रश्न विचारतात. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करत बिग बी आणि अभिषेक मिळून त्यांना रंग लावतात. आता त्यात आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांच्या घराच्या गेटवरच पाण्यानं भरलेला एक मोठा टब असायचा आणि येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या टबमध्ये उडी मारल्याशिवाय होळी पार्टीत एन्ट्री मिळत नाही, म्हणून तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात आधी त्या टबमध्ये उडी घ्यावी लागत होती. (Bachchan's Holi Party) 



इतकंच नाही तर अमिताभ हे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यावर लक्ष ठेवायचे. प्रत्येक व्यक्तीला काय हवं आहे याकडे त्यांचे लक्ष असायचे. कोणी एकटं असेल तर त्याची साथ देत त्याला स्वत: अमिताभ सगळ्यांची ओळख करून देतात. इतकंच नाही तर होळीच्या गाण्यांवर स्वत: अमिताभ देखील धम्माल डान्स करतात. मात्र, आता बरीच वर्षे झाली आहेत बच्चन कुटुंबानं होळीच्या पार्टीचे आयोजन केलेले नाही. 


हेही वाचा : VIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?'


दरम्यान, अमिताभ यांनी आता पर्यंत असे अनेक चित्रपट केले आहेत, ज्या चित्रपटांमध्ये होळीची गाणी ही नक्कीच आहेत. इतकंच काय तर आजही त्यांच्या चित्रपटातील गाणी ही होळीच्या निमित्तानं लावण्यात येतात आणि पार्टीत उपस्थित असलेले सगळेच लोक याचा आनंद घेतात