VIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?'

Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रणबीरच्या महिला चाहत्यांना धारेवर धरलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांनी महिला चाहत्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये घडला आहे. 

Updated: Mar 5, 2023, 02:57 PM IST
VIDEO : Ranbir Kapoor ला पाहताच चाहतीचा सुटला ताबा; नेटकरी म्हणाले 'हा पुरुषांचा विनयभंग नाही का?' title=

Ranbir Kapoor's Female Fans Got Trolled : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणबीर सध्या 'तू झूठी मैं मक्कार' (Tu Jhoothi Main Makkaar) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. इतकंच काय तर तो सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात रणबीरसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री श्रद्धा कपूर दिसणार आहे. चित्रपटाच्या यशासाठी रणबीर आणि श्रद्धा प्रमोशनसाठी सतत कुठे ना कुठे जाताना दिसत आहेत. याच दरम्यान, रणबीरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी त्याच्या चाहतीनं जे केले ते पाहूण सगळ्यांना आश्चर्य झाले आहे. रणबीरच्या चाहतीनं त्याच्यासोबत जे केले ते करणे पूर्णपणे चूकीचे आहे असं म्हणत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. 

रणबीर कपूर नुकताच मुंबईत एका कार्यक्रमात त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. रणबीरला पाहाताच त्याच्या अवती-भोवती गर्दी केली. यावेळी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या महिला चाहत्यांनी तर खूप गर्दी केली होती. यावेळी एक चाहती अचानक आली आणि रणबीरला पाहताच तिला स्वत: वरचा ताबा सुटला आणि ती रणबीरच्या चेहऱ्याला आणि त्याला चुकीच्या पद्धतीनं हात लावू लागली. तर एका महिला चाहतीनं तर रणबीरला त्याच्या हातावर किस देखील केले. हे पाहिल्यानंतर अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.  

पाहा व्हिडीओ - 

रणबीरसोबत फोटो क्लिक केल्यानंतर त्याची ती चाहती खूप रडू लागली. मात्र, दुसरीकडे त्या चाहतीला नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, हा एक प्रकारचा अत्याचार आहे. असं कोणताही पुरुष चाहता नाही करू शकतं. दुसरा नेटकरी म्हणाला, रणबीरनं हे खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं आहे कारण त्या लोकांनी कधीच हद्द पार केली होती. तिसरा नेटकरी म्हणाला, मला कळतं नाही की हे चाहते इतके वेडे का होतात आणि अशी हद्द पार करतात. आणखी एक नेटकरी म्हणाला, हा पुरुषाचा विनयभंग आहे. 

हेही वाचा : 35 वर्षं वेगळे राहिल्यानंतर Kareena आणि Karishma चे आई-वडील आले एकत्र? लग्नाच्या 17 वर्षानंतर झाले होते विभक्त

रणबीर आणि श्रद्धाचा हा चित्रपट 8 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानंतर रणबीर 'एनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. तर हा चित्रपट वर्षाच्या शेवटी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.