Baipan Bhaari Deva Marathi Movie: सर्वांना उत्सुकता लागलेला 'बाईपण भारी देवा' हा चित्रपट 30 जूनला प्रदर्शित झाला अन् सध्या महाराष्ट्रभर हा सिनेमा गाजताना दिसतोय. चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब, सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. अशातच आता दिग्दर्शक केदार शिंदे यांची (Kedar Shinde Emotional Post) सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय.  


काय म्हणाले केदार शिंदे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 पासून बाईपण भारी देवा या सिनेमाचा ध्यास घेतला होता. निर्माता मिळत नव्हता, त्यावेळीच्या कित्येक रात्री डोळ्यात पाणी यायचं. मनात असंख्य विचार. या सगळ्याला हँडल करण्याचं सामर्थ्य मिळालं ते स्वामींमुळे आणि या दोघींमुळे. आपण क्रिएटिव्ह असतो तेव्हा संसार चालतो तो घरच्या गृहिणी मुळेच. बेला तर दोन जबाबदाऱ्या सांभाळते. घर आणि सिनेमा याची निर्मिती!! घरकी मुर्गी डाल बराबर समजून उपयोगाचं नाही. तो मान सन्मान दिलाच पाहिजे, असं केदार शिंदे म्हणतात.


तिने नेहमी मला धीर देण्याचं काम केलय. बायकांचं मन जाणून घेताना, कित्येक वेळा बायकोचं मन मी विसरून गेलो आहे. आणि माझी सना.. या सिनेमाच्या प्रोजेक्ट रिपोर्टपासून सगळ्याची जबाबदारी तिने सांभाळली. या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पडेल ते काम करत होती. हा सिनेमा पुर्ण होऊ शकला तो सनामुळे. 6 अभिनेत्रींना मेकअप रूममधून सेटवर आणायचं महत्त्वपूर्ण काम ती करायची. यांच्या गप्पा थांबवून हे करणं किती अवघड आहे! हे इथे लिहून समजणार नाही, असंही केदार शिंदे म्हणतात.


महाराष्ट्र शाहीर हा नंतर केलेला सिनेमा. पण त्यात सना आत्मविश्वासाने भुमिका करू शकली ते या 6 अभिनेत्रींचा अभिनय पाहून! हा प्रवास खडतर होता, तरी आनंददायी होता. आज कोट्यावधी रुपये हा सिनेमा कमावतो आहे, त्याची एक क्रेझ निर्माण झाली आहे. पण कोट्यावधी रुपयांपेक्षा मोलाची माझी टीम, त्यामुळे हे घडलं, असंही केदार शिंदे म्हणतात.


पाहा पोस्ट -



दरम्यान, थोडा श्वास घ्या आणि स्वत: साठी जगा, असं दृष्टीकोन अभिव्यक्त करणारा सिनेमा प्रत्येक महिलेला भारावून टाकणारा आहे. रिलीजच्या 11 व्या दिवशी या सिनेमाने तीन कोटींचा गल्ला जमवल्याची माहिती देखील समोर आली आहे.