लग्नानंतर 21 वर्षांनी 'या' अभिनेत्याचा घटस्फोट
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोलसोबत 'बेखुदी' सिनेमात काम केलेला अभिनेता कमल सदाना आणि लीजा जॉन यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी आपल्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. हे कपल तब्बल 21 वर्षांच्या संसारानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेत आहेत.
ईटाईम्ससोबत बोलताना सांगितलं की,'दोन लोकं वेगळे होतात. आणि वेगवेगळ्या दिशेला जातात. अशा गोष्टी अनेक ठिकाणी बोलल्या जातात. आणि आम्ही देखील त्यापैकी एक आहे.' कमल आणि लीजा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 1 जानेवारी 2000 रोजी त्यांचं लग्न झालं. दोघांना दोन मुलं आहेत. मुलाचं नाव Angath तर मुलीच नाव Leia
मिळालेल्या माहितीनुसार, ही जोडी आता एकमेकांपासून लांब राहत आहे. कमल मुंबईत आहे तर लीजा आपल्या पालकांसोबत गोव्याला शिफ्ट झाली आहे. कामाबद्दल बोलायचं झालं तर कमल 90 दशकातील लोकप्रिय अभिनेता आहे. "बेखुदी' सिनेमातून डेब्यू केला. हा सिनेमा 1992 मध्ये आला होता. या सिनेमात काजोल त्याच्या अपोझिट होतील. मात्र हा सिनेमा चालला नाही.
1993 मध्ये तो 'रंग' नावाच्या सिनेमात दिसला. दिव्या भारतीने या सिनेमात अपोझिट रोलमध्ये होती. या सिनेमाला खूप चांगली पसंती मिळाली होती. 'फौज, बाली उम्र को सलमा, रॉक डान्सर, हम है प्रेमी, अंगारा, जालसाज, मोहब्बत आणि जंद सारख्या सिनेमात काम केलं आहे.'तसेच दिग्दर्शनातही या अभिनेत्याने आपलं नशिब अनुभवलं आहे. कमलने कर्कश आणि Roar: Tigers of the Sundarbans सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मात्र या सिनेमात त्यांना यश मिळालेलं नाही.
लग्नानंतर 21 वर्षांनी 'या' अभिनेत्याचा घटस्फोट