Urfi Javed :  टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed ) नेहमी चर्चेत येत असते. ती चित्रविचित्र ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येते.इतकेच नाही तर तिच्या विचित्र फॅशन स्टेटमेंटमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली  आहे. तिच्यावर टीकाही होत असताना तिच्यावर मात्र काही परिणाम झाला नाही. याउलट ती चर्चेत येण्याची एकही संधी सोडत  नाही. त्यातच आता हद्दच पार करून टॉपलेस व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर करून इ्ंटरनेट जगात खळबळ उडवून दिली आहे. ज्यामध्ये तिने नागीणीचा अवतार गुंडाळून पोज दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्फी जावेदने (Urfi Javed new look) पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटो शेअर करून चाहत्यांना चकीत केले आहे. उर्फी जावेदचे हे फोटो पाहून चाहतेही हैराण झाले आहेच. यात ती टॉपलेस होऊव शरीरावर नागिण गुंडाळली आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच नेटकऱ्यांनी त्यावर कंमेट देण्यास सुरुवात केली.सोशल मीडियावर ट्रोल होणे उर्फीसाठी नवीन गोष्ट नाही आणि उर्फीने असा बोल्ड ड्रेस परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही कारण उर्फी यासाठी ओळखली जाते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Uorfi (@urf7i)


या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, "देखना कहीं नेवला शिकार नहीं कर ले", तर दुसऱ्या युजरने "नागिन की भी बेज्जती हो गई... उनको भी एक मानक है..." अशी कमेंट केली. तसेच ‘उर्फी जैसी को विष कन्या कहते है’ असे एका कमेंटमध्ये लिहिले होते. तुला पाहून नागही पाताळ लोकात गेला."


वाचा: होळी खेळताना मोबाइल पाण्यात पडला तर काय कराल? 


अलीकडेच उर्फी प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केलेल्या साडीमध्ये दिसली.उर्फी जावेदने अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या कार्यक्रमासाठी लाल रंगाची साडी नेसली होती.याशिवाय उर्फीने ब्लाउज आणि डोक्यावर मुकुट घातला आहे. तिने आपल्या लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. उर्फी अनेकदा तिच्या वेगळेपणासाठी ओळखली जाते.