Bholaa Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा सध्या त्याच्या 'भोला' (Bholaa) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रामनवमीच्या शुभ मुहुर्तावर चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून त्याची चांगलीच चर्चा सुरु होती. त्यामुळे पहिल्याच दिवशी 'भोला' या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. दरम्यान, या चित्रपटात अजय देवगणनं दिग्दर्शन आणि अभिनयही केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त प्रेक्षक नाही तर चित्रपट समिक्षकांनी देखील चित्रपटाला चांगली प्रतिक्रिया दिली असून चित्रपट त्यांच्या पसंतीस उतरल्याचे सांगितले आहे. दरम्यान, चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली ते समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भोला' या चित्रपटात अजय देवगणनं त्याचं दिग्दर्शनात असलेलं प्रभुत्व दाखवलं आहे. या चित्रपटात अजयसोबत अभिनेत्री तब्बू (Tabbu) देखील दिसत आहे. त्या दोघांना 'दृष्यम 2' (Drishyam 2) मध्ये प्रेक्षकांनी अखेरीस पाहिले होते. त्यानंतर त्या दोघांना पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना पाहून प्रेक्षकांना आनंद झाला आहे. त्या दोघांचा हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. 


चित्रपटानं पहिल्या दिवशी किती केली कमाई?


'भोला' या चित्रपटानं पहिल्याच दिवशी खूप चांगली ओपनिंग केली आहे.  चित्रपटाच्या कमाई विषयी बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार, भोला चित्रपटानं पहिल्याच दिवशी 11.50 कोटींची कमाई केली आहे. आता विकेंडला चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेन असे म्हटले आहे. दरम्यान, भोला आणि अजय-तब्बूचा सगळ्यात शेवटचा चित्रपट 'दृष्यम 2' यांच्यात तुलना केली, तर 'दृष्यम 2' नं पहिल्याच दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. भोलानं 'दृष्यम 2' पेक्षा कमी कमाई केली असली तरी देखील लवकरच विकेंडमुळे चित्रपट चांगली कमाई करणार. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, 'भोला' या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू व्यतिरिक्त, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा, अमाला पॉल, मकरंद देशपांडे आणि गजराज रावसारखे अनेक कलाकार आहेत. 'भोला' हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'कैथी'चा ऑफिशियल हिंदी रिमेक आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे. 


हेही वाचा : हार्डी संधूकडून Parineeti Chopra - Raghav Chadha च्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; म्हणाला, 'मी तिला फोन केला आणि...'


'कैथी' हा एक तमिळ शब्द आहे. ज्याचा हिंदीत अर्थ हा कैदी असा होतो. या चित्रपटात कार्थी, नरेन, अर्जुन दास, जॉर्ज मॅरीन आणि हरीश उथमान सारख्या बड्या कलाकारांनी साकारल्या आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिका ही कार्थीनं साकारली होती. त्यानं त्याच्या दमदार अभिनयानं फक्त समिक्षकांची मने नाही तर प्रेक्षकांची मने देखीलजिंकली होती. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक सुरु होतं. अजय देवगणची भोलाही भूमिका कार्थी या भूमिकेशी प्रेरित आहे.