'या' प्रसिद्ध गायकाकडून परिणीती - राघव च्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; म्हणाला, 'मी तिला फोन केला आणि...'

Hardy Sandhu On Parineeti Chopra Relation: हार्डी संधूनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. हार्डीच्या आधी  आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परिणीति आणि राघव यांच्या रिलेशनशिपवर सोशल मीडिया पोस्ट शेअर करत वक्तव्य केलं होतं. 

Updated: Mar 31, 2023, 03:40 PM IST
'या' प्रसिद्ध गायकाकडून परिणीती - राघव च्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब; म्हणाला, 'मी तिला फोन केला आणि...' title=

Parineeti Chopra and Raghav Chadha Marriage​: बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा (Parineeti Chopra) गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे आम आदमी पार्टीचे चर्चेत राहणारे नेता आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) हे आहेत. काही दिवसांपूर्वी परिणीति राघव चड्ढा यांच्यासोबत दिसली होती. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा झाल्या. अशात राघव चड्ढा यांनी एका पत्रकारानं प्रश्न विचारता मला राजकारणावर प्रश्न विचारा परिणीतिवर नाही असं म्हटलं होतं. अशात आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा (Sanjeev Arora) यांनी सोशल मीडियावर राघव आणि परिणीति या दोघांचा फोटो शेअर करत त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला होता. पण त्या दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अशात त्यांना पुन्हा एकदा स्पॉट करण्यात आल्यानंतर आता अभिनेता आणि गायक हार्डी संधूनं (Harrdy Sandhu) त्या दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. इतकंच काय तर ते दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचं देखील त्यानं सांगितलं. 

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत हार्डीनं परिणीति आणि राघव यांच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं. त्याला परिणीति तिच्या आयुष्यात सेटल होत आहे, यानं खूप आनंद झाला आहे. मला खूप आनंद आहे की अखेर हे होतं आहे. मी त्यांना शुभेच्या देतो. 

यापुढे हार्डी म्हणाला, 2022 मध्ये जेव्हा ते त्यांची स्पाय-थ्रिलर ‘कोड नेम: तिरंगा’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. तेव्हा आम्ही लग्नाविषयी बोलायचो. तेव्हा ती बोलायची की मी तेव्हाच लग्न करण्याचा निर्णय घेईन जेव्हा मला चांगला मुलगा भेटेल.  त्या दोघांच्यचा लग्नाची चर्चा सुरु होती. पुढे त्यानं हे देखील सांगितलं की तो परिणीतिशी फोनवर बोलला आणि तिला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हा मी तिला फोन केला आणि शुभेच्छा दिल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हार्डीनं असं वक्तव्य करण्याआधी आम आदमी पार्टीचे खासदार संजीव अरोडा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही बातमी शेअर केली होती. त्यावेळी त्यांनी परिणीति आणि राघव यांचा एक फोटो देखील शेअर केला होता. हा फोटो शेअर करत 'मी परिणीति चोप्रा आणि राघव चड्ढा यांना खूप खूप शुभेच्छा. ते दोघं प्रेमाचं युनियन, आनंद आणि कम्पॅनियनशिपनं आनंदी रहा. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!' असं कॅप्शन देखील त्यांनी दिले होते. 

हेही वाचा : Parineeti Chopra आणि राघव चड्ढा यांना खूप खूप शुभेच्छा; आप खासदाराने केलेल्या ट्विटने वेधलं लक्ष

दरम्यान, या सगळ्या चर्चा सुरु असतानाच आता परिणीति आणि राघव यांनी पुन्हा एकदा स्पॉट करण्यात आलं आहे. बुधवारी ते दोघं दिल्ली विमानतळावर दिसले होते. यावेळी पत्रकारांना आणि पापाराझींना पाहून परिणीति घाई-घाईत आली आणि गाडीत बसली. त्यावेळी तिच्यासोबत राघव देखील दिसले. ते देखील घाई-घाईत आले आणि गाडीत बसले.