मुंबई :  बिग बॉस ११ हे सिझन एक ना अनेक कारणांनी चर्चेत आहे. तर एक कारण आहे अर्शी खान... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शी खान अगदी शोच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. तिच्या अदा तर कधी तिची स्टाइल. पण या सगळ्यापेक्षा ती अधिक चर्चेत आहे ते तिच्या नाइटीमुळे.  अगदी शोच्या सुरूवातीपासून अर्शी खानची नाइटी बिग बॉसमधील स्पर्धकांचं आणि प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. 


नाइटी लोकप्रिय होण्याचं खरं कारण? 


विकास गुप्ताच्या आग्रहास्तव तिने नाइटी परिधान करणे आता बंद केले आहे. परंतु तिच्या पब्लिसिस्ट फ्लिन रेमेडियोजने याबाबतचा खुलासा केला आहे की, वास्तविक जीवनातही अर्शी खान नाइटी क्वीन आहे. तिला नाइटी घालायला खूप आवडते. याची झलक आतापर्यंत बिग बॉसच्या घरात बघावयास मिळाली आहे. 


मिळालेल्या वृत्तानुसार, अर्शी खानला नाइटी घालायला खूप आवडतात. त्यामुळेच तिच्याकडे ५०० पेक्षा अधिक नाइटींचे कलेक्शन आहे. जेव्हा अर्शी घरी असते अन् कोणी गेस्ट येणार नसतील तर अर्शी नाइटी घालून घरात वावरणे पसंत करते. आश्चर्याची बाब म्हणजे अर्शी खानने ‘काफ्तान-लाइफ नाइटीज्’ नावाने एक ब्रॅण्डही लॉन्च केला होता. परंतु पुरेसा फंड नसल्याने अन् नॅशनल मार्केटिंगकडून फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने तिचा हा ब्रॅण्ड फारसा यशस्वी झाला नाही. 


अर्शी खानची नाइटीज् प्रचंड लोकप्रिय झाली असून, त्याचीही सध्या चर्चा रंगत आहे. कदाचित बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर अर्शीच्या या नाइटीज् ब्रॅण्डला मदतही मिळण्याची शक्यता आहे.